By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 20, 2019 02:12 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान त्यांना पकडणाऱ्या पाकिस्तानी कमांडो अहमद खानला भारतीय सैनिकांनी ठार केले. तो नियंत्रण रेषेवरून काही दहशतवाद्यांसह भारतात घुसण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र भारतीय सैनिकांनी त्याचा हा प्रयत्न हाणून पाडत त्याचा खात्मा केला.
अहमद खानने यापूर्वीही नौशेरा, सुंदरवनी , पल्लनवाला आणि आजूबाजूच्या सेक्टर मधून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. गेल्या काही दिवसांपासून त्याला पाकच्या नियंत्रणरेषेवर तैनात करण्यात आले होते. भारतीय शेतीला दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यात मदत व्हावी म्हणून त्याला या ठिकाणी ठेवण्यात आले होते. भारत पाकिस्तानमध्ये चकमक झाली. त्यावेळी पुंच्छमधील कृष्णा घाटीमध्ये बॉम्ब फेकले. तेव्हा काही दहशतवादी नियंत्रणरेषेवरून भारतात घुसण्याचा प्रयत्न होते. मात्र भारतीय जवानांनी पाकला चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत भारतीय जवानांनी अहमदला ठार मारले.
संपूर्ण देशभर गाजलेल्या नेवाळी आंदोलन समितीचे अध्यक्ष मथुर म्हात्रे यांच....
अधिक वाचा