By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 09, 2019 05:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
रिलायन्सला चार दिवसात 70 हजार कोटींचा फटका बसला आहे. शेअर बाजार आज तीन महिन्यांच्या खालच्या स्तरावर जाऊन बंद झाला. जागतिक बाजार कोसळत असल्याने याचा परिणाम सेंन्सेक्स आणि निफ्टीवरही झाला आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनच्या वस्तूंवर 25 टक्क्यांनी कर वाढविला आहे. यामुळे गेल्या 4 दिवसांपासून शेअर बाजार कोसळत असून यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे तब्बल 70 हजार कोटी रुपये बुडाले आहेत.
सेन्सेक्स 230.22 अंकांनी कोसळून 37,558.91 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 57 अंकांनी कोसळून 11301.80 वर बंद झाला. यावेळी सर्वाधिक घसरण बँकिंग आणि इन्फ्राशी संबंधीत शेअरवर झाली. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि कोल इंडियाच्या शेअर्समध्ये 3.5 टक्क्यांची घसरण झाली.
दुष्काळी भागातील पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती, टँकर मंजुरी, चारा छावण्या ....
अधिक वाचा