ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दापोडी दुर्घटना : सदोष मनुष्यवधाचा चौघांवर गुन्हा दाखल

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 03, 2019 12:41 PM 2019-02-12T14:15:30+5:30

दापोडी दुर्घटना : सदोष मनुष्यवधाचा चौघांवर गुन्हा दाखल

शहर : पुणे

दापोडीमधील दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुख्य ठेकेदार एम. बी. पाटील यांच्यासह दोन सुपरवायजर आणि उपकंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना अटक करण्यात आली असून एम. बी. पाटील अजूनही मोकाट आहेत. पालिकेकडून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचं स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

दुर्घटनेत मृत पावलेल्या विशाल जाधव या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना विम्याच्या आणि राज्य सरकारच्या निर्देशानुसार २० लाख मदत मिळेल, अशी माहिती देण्यात आलीय. मृत कामगाराला विम्याच्या माध्यमातून दोन लाख मदत मिळेल तसेच इतर ही मदत करण्याचा महापालिकेचा प्रयत्न असल्याचे सत्ताधारी भाजपने स्पष्ट केले आहे.

पिंपरी चिंचवडच्या दापोडीमध्ये ढिगाऱ्याखाली अडकून नागेश कल्याणी जमादार आणि अग्निशमन दलाचा कर्मचारी विशाल हणमंतराव जाधव या दोघांना प्राण गमवावे लागले. या घटनेनंतर महापालिकेच्या हलगर्जीपणाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात असून दोषींवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे. दापोडी इथे ड्रेनेजचे काम करण्यासाठी गेलेल्या तरूणाला वाचवण्याच्या प्रयत्नात दोन जणांचे बळी गेलेत.

दरम्यान, ड्रेनेज काम करताना ढिगाऱ्याखाली एक तरुण अडकल्याची बातमी मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी हजर झाले. त्यांनी तातडीनं या तरुणाला सुखरुप बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. परंतु, हे काम सुरू असताना चार जवान या ढिगाऱ्याखाली गाडले गेलेपरंतु, सावध असलेल्या अग्निशमन दलाच्या इतर अधिकाऱ्यांना आपल्या सहकाऱ्यांना वाचवण्यात यश आलंय. त्यांनी पहिल्यांदा ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सरोज पुंडे या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याला बाहेर काढलं. त्यानंतर त्यांनी निखिल गोगावले या कर्मचाऱ्यालाही सुखरुपपणे बाहेर काढले.

मागे

'निर्भया' निधीचा एक पैसाही फडणवीस सरकारने खर्च केला नाही'
'निर्भया' निधीचा एक पैसाही फडणवीस सरकारने खर्च केला नाही'

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात घेतलेल्या प्....

अधिक वाचा

पुढे  

दोन पत्नींसह पतीची आत्महत्या
दोन पत्नींसह पतीची आत्महत्या

गाझियाबादमध्ये एका आत्महत्येच्या घटनेने खळबळ माजली आहे. आठव्या मजल्यावरू....

Read more