By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 26, 2019 02:12 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
लोणावळा - मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोल नाक्याजवळ वॅगनर कारला भीषण अपघात झाला आहे. त्यात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सचिन संपत कोळेकर (रा. सध्या कामोठे, नवी मुंबई, मूळ रा. सांगली) असं अपघातात मृत्यू झालेल्या कार चालकाचं नाव आहे.
सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला. खोपोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन हा त्याच्या कारने (क्रमांक -एमएच- ०४/जीएम -१०२६) काही कामानिमित्त त्यांच्या मूळ गावी गेले होते. गावावरून ते नवी मुंबईतील त्यांच्या कामोठे येथील घरी परतत जात होते. खालापूर टोल नाक्याजवळ त्यांचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि त्यांची कार पुढे जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाला मागून जोरात धडकली. या अपघातात सचिन यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच दस्तुरी (बोरघाट) महामार्ग पोलिस व खोपोली पोलिसांसह रस्ते विकास महामंडळाचे आपत्कालीन देवदूत पथक आणि देखभाल दुरुस्ती विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली. अपघातग्रस्त कार बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास खोपोली पोलिस करीत आहे.
कोल्हापूर - थर्टी फर्स्टसाठी तुम्ही बाजारात जाऊन मटण आणत असाल तर ....
अधिक वाचा