ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर रसायनीजवळ भीषण अपघात,चार ठार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 29, 2019 11:06 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर रसायनीजवळ भीषण अपघात,चार ठार

शहर : मुंबई

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर रसायनीजवळ भीषण अपघात झाला असून या अपघातात चार जण ठार झाले आहेत. पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव कारने टँकरला मागून जोरदार धडक दिली. यात कारमधील चार जण जागीच ठार झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. तर दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

अपघातग्रस्त कार सातारा येथून लग्न समारंभ आटोपून मुंबईकडे परतत होती. अपघात एवढा भीषण होत की अपघातग्रस्त कारचा चेंदामेंदा झाला आहे. ही कार अतीवेगाने चालविण्यात येत असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे गाडीवर नियंत्रण मिळवता आले नसल्याचे या अपघातानंतर सांगण्यात येत आहे. अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना कामोठेच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मागे

महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पदभार स्वीकारणार
महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पदभार स्वीकारणार

महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्रि....

अधिक वाचा

पुढे  

पेगासस मालवेअर काय होता?; हेरगिरी प्रकरणात विरोधकांची विचारणा
पेगासस मालवेअर काय होता?; हेरगिरी प्रकरणात विरोधकांची विचारणा

व्हाॅट्सअॅप हेरगिरी प्रकरणात विरोधी पक्षांनी गुरुवारी राज्यसभेत सरकारवर ....

Read more