ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

चूक झाली, असं पुन्हा कधी होणार नाही; गणरायापुढे प्रवीण तरडेंनी मागितली जाहीर माफी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 23, 2020 10:59 AM 2019-02-12T14:15:30+5:30

चूक झाली, असं पुन्हा कधी होणार नाही; गणरायापुढे प्रवीण तरडेंनी मागितली जाहीर माफी

शहर : मुंबई

शनिवारी साऱ्या देशात आणि परदेशातही मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाची सुरुवात झाली. प्रत्येकानं आपल्या परिनं गणरायाची प्रतिष्ठापना करत त्याच्यासाठी खास आरासही तयार केली. कलाकार मंडळीसुद्धा यात माहे राहिले नाहीत. गणपती बाप्पासाठी दरवर्षी काहीतरी सुरेख आणि तितकीच आकर्षक अशी सजावट करण्याकडे अनेकांचा कल असतो. कित्येकजण त्यासाठी विविध नवनवीन संकल्पनाही अंमलात आणतात.

मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनीही अशाच संकल्पनेसह यंदाच्या वर्षी बाप्पाची प्रतिष्ठापना केली. पण, बाप्पासाठी कल्पकतेनं केलेली आरास त्यांना अडचणीत आणणारी ठरली. ज्यामुळं अखेर सोशल मीडियावर त्यांनी केलेली पोस्ट डिलीट करत एका व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांची जाहीर माफी मागितली. यंदाच्या वर्षी तरडे यांनी पुस्तक गणपती या संकल्पनेअंतर्गत बुद्धिदेवता गणरायाचा पुस्तकांची आरास करत त्यात विराजमान केलं होतं. सोशल मीडियावर त्यांनी याचा फोटोही पोस्ट केला. पण, असं करताच त्यांच्यावर अनेकांनी टीका करण्यास सुरुवात केली. पुस्तकांचा ढीग रचत तरडे यांनी ही आरास साकारली. पण, यामध्ये त्यांनी भारतीय संविधानावर पाट ठेवत त्यावर बाप्पांना विराजमान केलं. ही बाब अनेकांनाच खटकली.तरडे यांची ही कृती खटकल्याची बाब निदर्शनास आणत त्याबाबत काहींनी नाराजी व्यक्त केली. ज्यानंतर त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत आपल्याकडून ज्यांच्या भाववा दुखावल्या गेल्या आहेत अशा सर्वांचीच जाहीर माफी मागितली.

         

'माझ्या घरी पुस्तक गणपती अशी संकल्पना होती. बुद्धिची देवता, बुद्धीचं प्रतीक अशी आणून दिलं', असं म्हणत आरपीआय, भीम आर्मी आणि लातूर, पुण्यातील काही संघटनांनी आपल्या ही चूक निदर्शनास आणून दिल्याचं तरडे यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी आपली चूक मान्य करत मूर्तीच्या बैठक व्यवस्थेत केलेला बदल सर्वांच्या लक्षात आणून दिला. आपण कायमच सामाजिक भावना जपण्यास प्राधान्य देत असून, यापुढं अशी चूक कधीच होणार नाही अशी हमी त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून घेत सर्वांचीच मनापासून माफी मागितली.

मागे

अदानी उद्योग समूहाकडे 'या' विमानतळांच्या देखभालीचे कंत्राट
अदानी उद्योग समूहाकडे 'या' विमानतळांच्या देखभालीचे कंत्राट

देशातील जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम विमानतळांच्या देखभाल आणि हाताळण....

अधिक वाचा

पुढे  

जाणून घ्या दीड दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी नियमावली
जाणून घ्या दीड दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी नियमावली

यंदा राज्यात गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. राज्यात आज द....

Read more