By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 08, 2020 12:32 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
नवी दिल्ली – जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) झालेल्या भीषण हल्ल्यानंतर देशभरातून निषेद व्यक्त केला जात आहे. तसेच चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणनेही ह्या हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना पाठींबा दिला आहे. तिने जेएनयूच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आईशी घोष हिची भेट घेतली.तसेच विद्यार्थ्यानी आयोजित केलेल्या हल्ल्याविरोधी आंदोलनातही सहभाग दर्शवला.
दरम्यान, या आंदोलनात जेएनयूचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार देखील सहभागी झाले होते. तसेच गरीबी आणि जातिवाद यांच्यापासून देशाला मुक्तता मिळण्यासाठी घोषणा दिल्या. पोलिसांनी लाठी चार्ज केला किंवा तुरुंगात टाकले काय आम्ही एकजुटीनेच राहू असे निर्धार त्यांनी केला. तसेच दीपिकाने दाखवलेल्या संवेदनशील पाठींब्याबद्दल तिचे आभार मानले.
कन्हैया कुमार म्हणाले, “विद्यार्थ्यांबद्दल सहानुभूती दाखवून पाठिंबा दिल्याबद्दल खूप धन्यवाद. तुम्हाला खूप ताकद मिळो. तुम्हाला आज विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला म्हणून ट्रोल केले जाईल किंवा तुमचं शोषणही होईल. मात्र, इतिहास तुमचं धाडस आणि भारताच्या मूळ संकल्पनेसोबत उभं राहण्याच्या कृतीला नेहमी लक्षात ठेवील.”
Delhi: Deepika Padukone greets Jawaharlal Nehru University Student Union (JNUSU) President Aishe Ghosh at the university, during protest against #JNUViolence. (earlier visuals) pic.twitter.com/89P9ixwmAh
— ANI (@ANI) January 7, 2020
More power to you @deepikapadukone and thank you for your solidarity and support. You might be abused or trolled today, but history will remember you for your courage and standing by the idea of India. pic.twitter.com/q9WkXODchL
— Kanhaiya Kumar (@kanhaiyakumar) January 7, 2020
दीपिकाने जखमी विद्यार्थ्यांना पाठिंबा दिल्यानंतर भाजपच्या काही नेत्यांसह काही धार्मिक गटांकडून दीपिका पदूकोणच्या आगामी छपाक चित्रपटाविरोधात बहिष्काराचं आवाहन केलं जात आहे. सोशल मीडियावर बॉयकॉट छपाक हा हॅशटॅगही ट्रेंड केला जात आहे. तसेच दीपिकाला लक्ष्य केल्यानंतर अनेक लोक दीपिकाच्या बाजूनेही उभे राहतानाही दिसत आहेत. सोशल मीडियावर आय सपोर्ट दीपिका हा ट्रेंडही झाला आहे.
बगदाद - इराणने अमेरिकेच्या लष्करी हवाई तळावर क्षेपणास्त्र हल्....
अधिक वाचा