ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या 'अदानी' व 'बेस्ट'ची वीज महागण्याची शक्यता

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 04, 2020 12:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या 'अदानी' व 'बेस्ट'ची वीज महागण्याची शक्यता

शहर : मुंबई

        मुंबई - पुढील पाच वर्षांत मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या अदानी व 'बेस्ट'ची वीज मोठ्या प्रमाणात महागण्याची शक्यता आहे. या दोन कंपन्यांकडून वीज वहनाचे शुल्क वसूल करण्यासंबंधी प्रस्तावित खर्चाची याचिका राज्य सरकारच्या महापारेषण कंपनीने राज्य नियामक आयोगाकडे केली आहे. 


         या याचिकेनुसार वहन शुल्कात भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. २९ जानेवारीला निकाल येणे अपेक्षित आहे. राज्यभरात वीजपुरवठा करणाऱ्या विविध कंपन्या आहेत. मुंबई शहर आणि उपनगरातील बहुतांश भागात 'बेस्ट' आणि अदानी समूहातील अदानी एनर्जी मुंबई लिमिटेड ही कंपनी विजेचा पुरवठा करते. रेल्वेदेखील स्वतंत्रपणे विजेचा पुरवठा करते. या सर्व कंपन्या वीजपुरवठ्यासाठी महापारेषण कंपनीच्या पायाभूत सुविधेचा वापर करतात. ही सुविधा वापरण्यासाठी महापारेषण या कंपन्यांकडून वार्षिक शुल्क वसूल करते.


         यानुसार आता २०२०-२१ ते २०२४-२५ साठीच्या शुल्कनिश्चितीसाठी महापारेषणने आयोगाकडे याचिका केली आहे. या याचिकेनुसार अदानी कंपनीने पहिल्या वर्षी ८३५.२० कोटी रुपये महापारेषणला देणे अपेक्षित आहे. तर, बेस्टचा हा आकडा ४५८.१९ कोटी रुपये आहे. त्यानंतर २०२१-२२ ते २०२३-२४ दरम्यान शुल्काचा हा आकडा दोन्ही कंपन्यांचा कमी आहे. पण अखेरच्या वर्षात (२०२४-२५) त्यात पुन्हा वाढ प्रस्तावित आहे.


       अदानी एनर्जी मुंबई लिमिटेडने मुंबईतील वीज पुरवठ्याचा व्यवसात रिलायन्स इन्फ्राकडून खरेदी केला. रिलायन्स इन्फ्राअंतर्गत २०१९-२० साठीचे शुल्क ३९८.७२ कोटी रुपये होते. तर बेस्टचे हे शुल्क २२४.४७ कोटी रुपये आहे. त्या तुलनेत आगामी वर्षातील प्रस्तावित वाढ फारच मोठी ठरणार आहे.
 

मागे

अमेरिका-इराण हल्यामुळे बाजार घसरला
अमेरिका-इराण हल्यामुळे बाजार घसरला

        आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणाऱया घडामोडींचा जागतिक शेअर बाजारांस....

अधिक वाचा

पुढे  

'खातेवाटपाला उशीर का होतोय हे मुख्यमंत्रीच सांगतील' - संजय राऊत
'खातेवाटपाला उशीर का होतोय हे मुख्यमंत्रीच सांगतील' - संजय राऊत

         राज्य मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसल....

Read more