ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

...इथे ३५ वर्ष झाले अंत्यविधीनंतर पिंडाला कावळा शिवलाच नाही

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 21, 2019 07:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30

...इथे ३५ वर्ष झाले अंत्यविधीनंतर पिंडाला कावळा शिवलाच नाही

शहर : सातारा

          सातारा - हिंदू धर्मामध्ये पिंडाला कावळा शिवल्या शिवाय त्या मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळत नाही असं म्हणले जातं. पण साताऱ्यातील गावे आहेत जिथे गेली ३५ वर्ष झाले कोणत्याही अंत्यविधीनंतर पिंडाला कावळा शिवलेला नाही. कशामुळे असं होतंय? काय आहे या मागचं?


          सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यातील जाखीनवाडी परिसरातून कावळाच गायब झालाय. त्याचा परिणाम म्हणजे, या गावांमध्ये मृत्यूनंतरच्या पिंडदानावेळी शिवण्यासाठी कावळाच मिळत नाही. त्यामुळं या भागात गेल्या ३५ वर्षांपासून कावळ्याविना पिंडदान विधी केला जातोय. कावळ्याऐवजी या भागात गायीला पिंड भरवला जातो, असं हिंदुराव पाटील आणि धोंडीराम पाटील या गावकऱ्यांनी म्हटलंय. 


          गावकऱ्यांनी पूजा अर्चा केल्या पण कावळे काही या भागात परत आले नाहीत. जाखीनवाडी भागात गेल्या पन्नास वर्षांपासून फक्त ऊस शेती केली जाते. शेत शिवारांमध्ये कावळ्यांना काहीच खायला मिळत नसल्यानं कावळ्यांनी जाखीनवाडीतून आपला अधिवास हलवल्याचा दावा पक्षीप्रेमी सुनील भोईटे यांनी केलाय.


         पिंडाला शिवण्यापुरतीच कावळ्यांची भूमिका नाही. कावळा हा निसर्ग साखळीतला सफाई कर्मचारी म्हणून ओळखला जातो. या भागात कावळे गायब होणं, हे पर्यावरणाच्या गंभीर समस्येचं एक लक्षण मानलं जातंय.
 

मागे

जाणून घ्या PPF विषयी नवे नियम !
जाणून घ्या PPF विषयी नवे नियम !

                 मुंबई - केंद्र सरकारने पब्लिक प्राॅव्हिडंट फंडाविष....

अधिक वाचा

पुढे  

NRC : काँग्रेसचा विरोध, सोनिया गांधींचे उद्या धरणे आंदोलन
NRC : काँग्रेसचा विरोध, सोनिया गांधींचे उद्या धरणे आंदोलन

नागरिकत्व कायद्याला देशभरात विरोध होत असताना, दिल्लीतल्या राजघाट इथे काँग....

Read more