By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 13, 2020 05:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
नवी दिल्ली - 'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' हे पुस्तक अतिशय वादग्रस्त ठरले. या पुस्तकात मोदी आणि छत्रपती शिवरायांची तुलना करण्यात आल्यानं देशभरात आंदोलने सुरू झाल्यानंतर आज, भाजपने हे पुस्तक अखेर मागे घेण्याचे आदेश लेखकाला दिले आहेत.
लेखक जगभगवान गोयल यांना पुस्तक मागे घेण्याच्या सूचना दिल्याची माहिती, भाजप उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी एका वृत्तवाहिनीला दिली आहे. साडेतीनशे वर्षापासून महाराष्ट्राच्या अस्मितेचा सर्वोच्च अभिमानबिंदू असलेल्या छत्रपती शिवरायांबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना करण्यात आल्याने त्याबद्दल राजकीय वर्तुळात संतप्त प्रतिक्रिया येवू लागल्या होत्या.
शिवसेना खासदार संजय राऊत, शिवाजी महाराजांचे वंशज व भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी या पुस्तकावर लगेचच बंदी घाला, अशी मागणी भाजपा नेतृत्वाकडे केली होती. राज्यातील विविध ठिकाणांहून लेखकाची छायाचित्र घेवून निषेध व्यक्त करण्यात आला.
तेहरान - इराण आणि अमेरिकेतील संघर्ष पेटला असतानाच इराणने पुन्हा ए....
अधिक वाचा