By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 20, 2019 01:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
दक्षिण मुंबईत चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला आहे. एल.टी. रोड वर असलेल्या अहमद बिल्डिंगचा भाग कोसळला आहे. आज सकाळी 11 वाजता इमारतीचा हा भाग कोसळला. अग्मिशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
सविस्तर वृत असे की, अहमद इमारत धोकादायक म्हणून घोषित झाली होती. त्यामुळे इमारतीतील नागरिकांना काही दिवसांपूर्वीच स्थलांतरित केले होते. नागरिकांना वेळीच स्थलांतरित केल्यामुळे इमारत कोसळल्यानंतर जीवितहानी झाली नाही. मात्र इमारती खाली असलेल्या दुकानाच नुकसान झाल आहे.
अग्निशमन दलाने मदतकार्य सुरू केले आहे. तसेच वैद्यकीय मदतही पोहोचली आहे.
गोव्यात आयोजित पत्रकार परिषदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंदीच्य....
अधिक वाचा