By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 25, 2020 05:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : अहमदनगर
अहमदनगरमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. “मी नेमका कोरोना पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह?” असा प्रश्न त्याने पत्र लिहित मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. महापालिका प्रशासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या कोरोना चाचणीच्या रिपोर्टवर शंका उपस्थित केली आहे.या तरुणाने 21 ऑगस्टला भारतीय जैन संघटना, फोर्स मोटर्स, अहमदनगर जिल्हा रुग्णालयात संध्याकाळी 4 च्या दरम्यान पालिकेच्या कोरोना सेंटरमध्ये अँटीजन तपासणी केली होती. तर त्यावेळी कोरोना झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तो तरुण फार घाबरला .
पण त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला पॉझिटिव्ह असल्याचे सांगत होते. त्यामुळे त्याच्या मनात शंका आली. त्यामुळे त्याने मित्राला फोन करत सिव्हिल रुग्णालयात चाचणी केली. त्या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला.
मात्र तरीही त्याच्या मनातील शंका जात नसल्याने त्याने पुन्हा दुसऱ्या दिवशी 24 ऑगस्टला रॅपिड टेस्ट केली. तर त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर फार गोंधळलेल्या त्या तरुणाने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित याबाबतची तक्रार दाखल केली आहे.
तसेच मी पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह असा प्रश्नही त्या तरुणाने मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री याबाबत नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
रायगड जिल्ह्यातील (Raigad)महाड शहरात (Mahad)झालेल्या इमारत दुर्घटनेप्रकरणी पंतप्र....
अधिक वाचा