By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: जून 06, 2019 02:20 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : sangamner
कौठे कमळेश्वर शिवारात शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात अडीच वर्षांच्या बालकासह चार जण गंभीर जखमी झाले आहे. गुरुवारी सकाळी ही घटना घडली. कृष्णा वाल्मिक गायकवाड (वय-अडीच वर्षे) आणि संजय जगन भडांगे (वय ४०).
कौठे कमळेश्वर येथील गायकवाड वस्ती येथे सकाळी सातच्या सुमारास कृष्णा हा लहान बालक घराच्या अंगणात खेळत असताना पाठीमागून आलेल्या बिबट्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला. त्याच्या मानेला चावा घेतल्याने तो गंभीर जखमी झाला. घरच्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. जांभळीचा मळा येथे याच बिबट्याने संजय भडांगे यांच्यावर हल्ला करून, त्यांच्या डोक्याला चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे घाबरलेल्या संजय यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेताच बिबट्याने तेथूनही पळ काढला. जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.
बिबट्याच्या अचानक हल्ल्याने परिसरातील अनेकांनी धसका घेतला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समि....
अधिक वाचा