By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 08, 2019 11:21 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
आज वायुदेना दिवस आहे याचं औचित्य साधून गाझियाबाद येथील हिंडन एअरबेसवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सेनेचे जवान लडाऊ विमानांसोबत प्रात्यक्षिक करून दाखवणार आहेत. हिंडन एअरफोर्स स्टेशनवर पहिल्यांदाच लढावू हेलिकॉफ्टर 'अपाचे' आणि ट्रान्सपोर्ट हेलिकॉफ्टर 'चिनूक'ही दिसणार आहेत.
Delhi: Chiefs of three services, Army Chief Bipin Rawat, Indian Air Force Chief, RKS Bhadauria and Chief of the Naval Staff, Admiral Karambir Singh, pay tributes at National War Memorial on #IndianForceDay. pic.twitter.com/kFyKneKvfL
— ANI (@ANI) October 8, 2019
यासंदर्भात पहिले सेना प्रमुख बिपिन रावत, भारतीय वायु सेना प्रमुख आर के सिंह भदौरिया आणि नौसेना स्टाफचे प्रमुख एडमिरल करमबीर सिंह यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर जाऊन शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
वायुसेना आज ८७ वा 'वायुदेना दिवस' साजरा करत आहे. 8 ऑक्टोबर 1932 रोजी वायुसेनेची स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे दरवर्षी या दिवशी वायुसेनेकडून भव्य परेड आणि एअर शो आयोजित केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील वायुसेना दिवसाच्या निमित्ताने सर्व जवान आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
विजयादशमी आणि भारतीय वायुसेना दिवसाचे औचित्य साधून वायुसेनेची ताकद वाढवण्यात येत आहे. दीर्घ प्रतिक्षेनंतर अत्याधुनिक लढावू विमान 'राफेल' आजच्याच दिवशी आपल्या वायुसेनेत सहभागी होणार आहे. स्वतः सुरक्षा मंत्री राजनाथ सिंह हे राफेल विमानाचा ताबा घेणार आहेत. त्यानंतर ते वायुसेनेला सोपवण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेने हाती घेतलेल्या काही दुरुस्तीच्या कामामुळे लांब पल्ल्याच्या....
अधिक वाचा