ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

एअरटेल ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 30, 2019 11:42 AM 2019-02-12T14:15:30+5:30

एअरटेल ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार

शहर : देश

        भारती एअरटेल नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कॉल रेटच्या किंमतीत वाढ करत आहे. एअरटेलने दुसऱ्यांदा आपल्या मोबाईलच्या कॉल रेटमध्ये वाढ केली आहे. जर तुम्हाला एअरटेल नेटवर्कसोबत जोडून राहायचे असेल तर तुम्हाला किमान 45 रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची असणार आहे.


       आतापर्यंत एअरटेलच्या ग्राहकांना किमान 23 रुपयांचे रिचार्ज करावे लागत होते, पण आता यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. नव्या प्लॅननुसार आता जर तुम्हाला एअरटेल नेटवर्कसोबत कायम राहायचे असेल तर किमान 45 रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. याचाच अर्थ आता ग्राहकाला 22 रुपये अधिक मोजावे लागणार आहे. 


         यामध्ये डेटा किंवा कॉलिंगसाठी मिनिटे मिळणार नाहीत. तर, लोकल किंवा एसटीडी कॉलिंगसाठी 2.5 पैसे/सेकंद, व्हिडिओ कॉलिंगवर 5 पैसे/सेकंद, डेटा वापरासाठी 50पैसे/MB चार्ज आकारला जाईल. जर एअरटेलचा एखादा ग्राहक 45 रुपयांचा किंवा त्यापेक्षा जास्त रुपयांचा प्रीपेड रिचार्ज करीत नसेल तर त्याला सेवा न देण्याचा अधिकार कंपनीला असणार आहे, असे कंपनीने रविवारी आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले.


       मर्यादित सेवांसोबत 15 दिवसांचा अतिरिक्त वेळ ग्राहकांना दिला जाईल. ग्रेस पीरियड संपल्यानंतर मात्र ग्राहकाची सेवा संपुष्टात आणली जाईल. एअरटेलचे नवीन टॅरिफ दर रविवारपासून (दि.29) लागू झाले आहेत. यापूर्वी गेल्या महिन्यातच एअरटेलसह सर्वच आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांनी टॅरिफ प्लानमध्ये 40 ते 50 टक्के वाढ केली आहे.
 

मागे

मराठा महासंघ दिनदर्शिका प्रकाशन सोहळा
मराठा महासंघ दिनदर्शिका प्रकाशन सोहळा

सर्वाना हवी हवीशी वाटणारी मराठा महासंघ दिनदर्शिका प्रकाशन सोहळा रविवार २९ ....

अधिक वाचा

पुढे  

'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' पदावर जनरल बिपिन रावत यांची नियुक्ती
'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' पदावर जनरल बिपिन रावत यांची नियुक्ती

        नवी दिल्ली - भारताच्या 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' पदावर लष्करप्रमु....

Read more