ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

काश्मीर मध्ये आणखी 28 हजार सैनिक तैनात

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 02, 2019 12:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30

काश्मीर मध्ये आणखी 28 हजार सैनिक तैनात

शहर : jammu

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल काश्मीरच्या दौर्यालवर गेले होते. तेथून ते श्रीनगरमध्ये गेले. तेथे त्यांनी सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणाच्या वरिष्ठ अधिकार्यांणची वेगवेगळी बैठक केली. मात्र डोवाल काश्मीर दौरा करून आल्यापासुन जम्मू काश्मीर मध्ये सैनिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येत आहे. गेल्या 25 जुलैला केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या 100 कंपन्या म्हणजे 10000 जवानांना जम्मू कश्मीर मध्ये तैनात करण्यात आले. त्यानंतर काल 1 ऑगस्ट रोजी सुरक्षा दलाच्या आणखी 280 कंपन्या म्हणजेच 28000 जवानांना श्रीनगरमध्ये तैनात करण्यात आले आहे. तसेच शहरात प्रवेश करणारे आणि बाहेर जाणारे सर्व रस्ते सीआरपीएफच्या ताब्यात देण्यात आले आहेत. या प्रकारामुळे स्थानिक जनता संभ्रमात पडली आहे. त्यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. 
एअरलिफ्टकरून सीआरपीएफ जवानांना थेट काश्मीरला पोहोचवल जात आहे. सैनिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविल्याने काश्मिरात लष्करी छावणीचे स्वरूप आले आहे. हे  पाहून स्थानिक नागरिकांनी आवश्यक वस्तु खरेदी करून साठा करण्यास सुरवात केली आहे. येत्या 15 ऑगस्टला स्वतंत्र भारताचा 72 वा स्वातंत्रदिन साजरा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जवानांची संख्या वाढविण्यात येत असल्याने उलट सुलट चर्चांना उधाण आल आहे. 

 

मागे

गर्दीच्या वेळेत लोकलचे भाडे वाढवण्याचा विचार
गर्दीच्या वेळेत लोकलचे भाडे वाढवण्याचा विचार

कामाच्या वेळेत मुंबई उपनगरी रेल्वे मार्गात प्रचंड गर्दी होत असते. या गर्दी....

अधिक वाचा

पुढे  

रविश कुमार यांना रमन मॅगसेसे पुरस्कार
रविश कुमार यांना रमन मॅगसेसे पुरस्कार

एनडिटीव्हीचे मॅनिजिंग एडिटर रविश कुमार यांना यंदाचा रमन मॅगसेसे पुरस्कार ....

Read more