ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पांडुरंग रायकर यांचा मृत्यू हलगर्जीपणामुळेच, अजित पवारांकडून चौकशीचे आदेश

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 02, 2020 12:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पांडुरंग रायकर यांचा मृत्यू हलगर्जीपणामुळेच, अजित पवारांकडून चौकशीचे आदेश

शहर : पुणे

टीव्ही 9 मराठीचे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचा मृत्यू हलगर्जीपणामुळेच झाला, असे सांगत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. अजित पवारांनी विभागीय आयुक्तांकडे अहवाल मागितला आहे.

पांडुरंग रायकर यांचा जीव गेला, हे निश्चित दु:खदायक आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाईल. पुणे जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांना तसे सांगितल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

पुण्यात लक्ष दिलं जातं आहे, पालकमंत्र्यांनी लक्ष दिलं आहे. ग्रामीण भागातकोरोना पसरतआहे, हे खरे असले, तरी बेडकमी पडतअसतील तरी ते वाढवण्याचाप्रयत्न केलाजात आहे. अँटिजन टेस्ट केल्या जातात त्या आयसीएमआरच्या गाईडलाईन्स आहेत, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

पांडुरंग रायकर यांच्या मृत्यू प्रकरणात चौकशी केली जात आहे. कोव्हिड काळात काम करताना कोणी दगावला तर त्याला मदत केली जाईल. ते जीव धोक्यात टाकून काम करत आहेत. विम्याची मदत मिळवून द्यायचा त्यांना प्रयत्न करु, असे आश्वासन राजेश टोपे यांनी दिले.

मुरलीधर मोहोळ, पुणे महापौर

मागील साडेपाच महिने पांडुरंग रायकर पुण्यातील कोरोना परिस्थितीचं वृत्तांकन करत होते. मात्र, यातच त्यांना कोरोनाची लागण झाली. यानंतर त्यांना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात बेड उपलब्ध व्हावेत म्हणून आम्ही सर्वांनी प्रयत्न केले. बेड उपलब्ध झाला मात्र, कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. व्यवस्थेतील या त्रुटी पांडुरंग रायकर यांना आपल्यातून घेऊन गेल्या मी हे मान्य करतो. जबाबदारी कुणीही झटकायचीच नाहीये. ही महापालिकेची जबाबदारी आहे, की राज्य सरकारची असं म्हणून कुणीही जबाबदारी झटकायची नाहीये.

सत्यजित तांबे, युवक काँग्रेस अध्यक्ष

काल पत्रकार मित्रांचा फोन आला आणि त्यांनी पुण्यात बेडची उपलब्धता होत नसल्याचं सांगितलं. यानंतर मी तात्काळ प्रयत्न करुन डीवायपाटील रुग्णालयात संपर्क करुन बेड उपलब्ध करुन दिला. त्यावेळी मंगेशकर रुग्णालयात देखील बेड उपलब्ध झाला. त्यामुळे जवळचा पर्याय म्हणून तेथे दाखल करण्यात आलं. मात्र, पांडुरंग रायकर यांना ज्या पद्धतीने रुग्णवाहिका मिळाली नाही त्यावरुन पुण्यात कशी अवस्था असेल याची मी कल्पनाच करु शकतो. कोरोनाचं संकट फार मोठं संकट आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र या संकटाला 4-5 महिने झाले आहेत. आता तरी व्यवस्था नियोजित आणि सज्ज असायला हवी, अशी साधी माफक अपेक्षा आहे.

राम शिंदे, भाजप नेते

एक उमदा पत्रकार, चांगला व्यक्ती इतक्या कमी वयात जातो, एका व्यवस्थेचा बळी ठरतो, हे आपलं अपयश आहे, वेळेत उपचार मिळायला हवे होते. आता श्रद्धांजली व्यक्त करण्याशिवाय पर्याय नाही, पण उपचार मिळणे हे अत्यंत दुर्दैवी आहे.

नेमकं काय घडलं?

पांडुरंग रायकर यांना 20 ऑगस्टला थंडी आणि तापाचा त्रास, त्यानंतर डॉक्टरांकडे जाऊन उपचार.

पांडुरंग रायकर यांची 27 ऑगस्टला कोरोना चाचणी, मात्र अहवाल निगेटिव्ह

दुसऱ्या दिवशी म्हणजे 28 ऑगस्टला पांडुरंग रायकर अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव या गावी गेले.

गावी गेल्यावरही त्रास झाल्यामुळे कोपरगावमधे अँटीजेन टेस्ट, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह

रविवार 30 ऑगस्टला रात्री त्यांना अँब्युलन्समधून उपचारांसाठी पुण्यात आणलं, पुण्यातील पत्रकारांनी त्यांच्या नातेवाईकांच्या संमतीने रायकर यांना जंबो हॉस्पिटलमधे भरती केलं.

जम्बो हॉस्पिटलमधे त्यांच्यावर आयसीयूमधे उपचार सुरु होते, मात्र त्यांची परिस्थिती खालावत होती

रायकर यांना खाजगी हॉस्पिटलमधे दाखल करण्याचे प्रयत्न पुण्यातील पत्रकारांनी सुरु केले

काल (मंगळवार 1 सप्टेंबर) त्यांची ऑक्सिजन पातळी 78 पर्यंत खाली गेली.

जम्बो हॉस्पिटलमधून अन्यत्र नेण्यासाठी कार्डिॲक अँब्युलन्सची गरज होती. रुग्णवाहिका मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु होते. मंगळवारी रात्री एक अँब्युलन्स जम्बो हॉस्पिटलला पोहचली, पण त्यामधील व्हेंटीलेटर खराब झाल्याचं सांगितलं गेलं.

दुसरी अँब्युलन्स मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु होते, पण त्यात डॉक्टर उपलब्ध नव्हते. तोपर्यंत रात्रीचे बारा-सव्वाबारा वाजले होते.

पहाटे चार वाजता अँब्युलन्स मिळवण्याचा प्रयत्न पुन्हा सुरु झाला पण तोपर्यंत पांडुरंगची प्रकृती आणखी खालावली होती.

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडून पहाटे पाच वाजता अँब्युलन्स उपलब्ध असल्याचं सांगण्यात आलं आणि आयसीयूमधील डॉक्टरांचाआम्ही निघत आहोतअसा फोन आला.

पांडुरंगचे मित्र असलेले पत्रकार आणि नातेवाईक जम्बो हॉस्पिटलला पोहचले आणि डॉक्टरांनी साडेपाच वाजता त्यांचं निधन झाल्याचं सांगितलं.

कार्डिॲक अँब्युलन्स जम्बो हॉस्पिटलला पोहचली पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती.

पांडुरंग रायकर यांची कारकीर्द

पुण्यासारख्या शहरात आपल्या शांत आणि संयमी पत्रकारितेने पांडुरंग रायकर यांनी आपली विशेष ओळख निर्माण केली होती. लॉकडाऊन ते अनलॉकिंग आणि मिशन बिगिन अगेनपर्यंत सर्व महत्त्वाच्या घडामोडी पांडुरंग यांनीटीव्ही 9’ च्या माध्यमातून मराठी माणसापर्यंत पोहोचवल्या. त्यांच्या निधनाने टीव्ही 9 परिवाराला धक्का बसला आहे. मूळचे नगर जिल्ह्यातील असलेले पांडुरंग रायकर यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

टीव्ही मराठी, एबीपी माझा ते टीव्ही 9 मराठी असा पांडुरंग यांचा पत्रकारितेतील 15 वर्षांचा प्रवास. शेती ते सिनेमा, क्रीडा ते राजकारण अशा विविध विषयांवर पांडुरंग यांनी वार्तांकन केलं. गेल्या तीन वर्षापासून ते टीव्ही 9 मराठीसोबत होते.

पांडुरंग यांच्या निधनाने पुणे पत्रकारिता क्षेत्रासह राजकीय, सामजिक क्षेत्र आणि विविध मान्यवरांकडून शोक व्यक्त होत आहे. कोरोनाच्या संकटातही अविरतपणे काम करुन बातम्या देणाऱ्या पांडुरंग यांचीच बातमी होते, हा विचारच काळीज पिळवटून जातो. या कठीण काळात पांडुरंग यांच्या कुटुंबियांच्या पाठिशी टीव्ही 9 मराठी परिवार खंबीरपणे उभा आहे.

पुढे  

श्रीमंत लोकं लक्षणं नसताना आयसीयू बेड अडवतात : राजेश टोपे
श्रीमंत लोकं लक्षणं नसताना आयसीयू बेड अडवतात : राजेश टोपे

कोरोनाची लक्षणं नसताना श्रीमंत लोक ICU बेड वापरत आहेत. श्रीमंत लोकं ICU बेड वर ज....

Read more