ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

‘गंगुबाई काठीयावाडी’चा फर्स्ट लूक शेअर 

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 15, 2020 11:50 AM 2019-02-12T14:15:30+5:30

‘गंगुबाई काठीयावाडी’चा फर्स्ट लूक शेअर 

शहर : मुंबई

     प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी 'गंगुबाई काठीयावाडी' या चित्रपटाची नुकतीच घोषणा केली असून या चित्रपटात ‘द मॅडम ऑफ कामाठीपुरा’ या नावाने ओळखल्या जाणा-या गंगाबाई हिच्या जीवनाभोवती कथा फिरताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री आलिया भट मुख्य भूमिकेत असणार आहे. या चित्रपटातील फर्स्ट लूक समोर आला आहे. 


       गंगुबाई यांना लहान वयातच वेश्याव्यवसायात ढकलले गेले होते. त्यानंतर त्यांचे जीवन कसे बदलले, हा व्यवसाय करताना त्यांची खतरनाक गुंडांसोबत झालेली ओळख आणि त्यांच्या आयुष्यात आलेले चढ-उतारांचे प्रसंग या चित्रपटात चित्रित केले आहेत. 


        अभिनेत्री आलिया भट हिने या चित्रपटाच्या फर्स्ट लूकचे फोटो सोशल मीडिया वर शेअर केलेले आहेत. यामध्ये ती एका भिंतीला टेकून बसली आहे. तिच्या नजरेतून तिचे नैराश्य दिसत आहे. तर दुसरीकदे तिच्यात बाजूला एक बंदूक ठेवल्याचं दिसत आहे. तर दुस-या म्हणजे ब्लॅक अँड वाईट फोटोमध्ये तिच्या डोळ्यात राग दिसत आहे.

 

       दरम्यान, हा चित्रपट आलियाच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरणार असल्याचं म्हंटले जात आहे. तीच्यासाठीही अशी पहिलीच भूमिका ठरणार आहे. या चित्रपटाची कथा हुसैन जैदी यांच्या ‘द माफिया क्वीन ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित आहे. तसेच या चित्रपटाची निर्मिती पेन इंडिया आणि भन्साळी प्रॉडक्शन अंतर्गत करण्यात येणार आहे. हा चित्रपट ११ सप्टेंबर २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.         
 

मागे

सुन्न करणाऱ्या थंडीत सापडली जुळी अर्भक
सुन्न करणाऱ्या थंडीत सापडली जुळी अर्भक

      पुणे - महाराष्ट्रभरात थंडीची लाट उसळली असताना पाषाण तलावाजवळ एक धक्....

अधिक वाचा

पुढे  

मकर संक्रांतीनिमित्ताने विठ्ठल मंदिरात फुलांची सजावट
मकर संक्रांतीनिमित्ताने विठ्ठल मंदिरात फुलांची सजावट

            पंढरपूर : आज मकरसंक्रांती दिवशी सावळ्या विठ्ठलाच्या आणि र....

Read more