By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 22, 2020 03:49 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
देशात कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने होत आहे. देशात कोरोना विषाणूचा धोका पाहता भारतीय रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत महत्त्वाचा निर्णय़ घेतला आहे. 31 मार्चपर्यंत देशातील रेल्वेसेवा बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे.
ज्या गाडीचा प्रवास पूर्ण झाला आहे अशा गाड्या त्वरित थांबवण्यात येतील. सध्या 400 मालगाड्या धावत आहेत आणि गंतव्यस्थानावर पोहोचल्यानंतर ते बंद केल्या जातील. कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता रेल्वे बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.
In continuation of the measures taken in the wake of COVID-19, it has been decided that the cancellation of all passenger train services on Indian Railways and Konkan Railway shall be extended till the 2400 hours of 31.03.2020 as follows:#WarAgainstVirus pic.twitter.com/y3kLFckovU
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 22, 2020
रेल्वेने सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या एक्सप्रेस आणि इंटरसिटी ट्रेन बंद केल्या आहेत. 31 मार्च रात्री 12 वाजेपर्यंत ही रेल्वे सेवा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी भारतीय इतिहासातील हा एक मोठा निर्णय आहे. रेल्वेने जारी केलेल्या पत्रकात कोलकाता मेट्रो, कोंकण रेल्वे, उपनगरीय रेल्वे यांचा समावेश आहे. आज रात्री 12 वाजता उपनगरीय रेल्वे आणि कोलकाता मेट्रोची सेवा सुरु राहणार आहे.
Strengthening precautions against COVID-19, Railways has decided that no passenger train will run up to 31st March.
— Piyush Goyal (@PiyushGoyal) March 22, 2020
Let us work together as #IndiaFightsCorona pic.twitter.com/374b0V5sD3
ज्या गाड्या 4 तासाआधी निघाल्या आहेत. त्या गाड्या शेवटच्या स्थानकापर्यंत जातील. पण आवश्यक वस्तू देशभरात पोहोचवण्यासाठी मालगाड्या सुरु राहणार असल्याचं रेल्वेन स्पष्ट केलं आहे. रेल्वे प्रवाशांनी ज्यांनी तिकीट काढले आहे. त्यांना पैसे रिफंड केले जाणार आहेत. तिकीट रद्द केल्यास कोणताही चार्ज घेतला जाणार नाहीये.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक महत्....
अधिक वाचा