By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 07, 2020 04:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
राज्यातील सर्व खाजगी इमारतींना सीसीटीव्ही लावणं बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार लवकरच पावलं उचलणार आहे. हे सीसीटीव्ही स्थानिक पोलीस ठाण्याशी कनेक्ट केले जातील. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल याबाबत एक बैठक बोलवली होती. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व इमारतींवर सीसीटीव्ही बसवण्यासाठी नियमावलीत बदल केले जाणार आहेत. मुंबईत पोलिसांना 5 हजार सीसीटीव्ही बसवले आहेत. मात्र ते पुरेसे नाहीत. खाजगी इमारतींवर सीसीटीव्ही बसवले तर त्याची संख्या 10 लाखाच्या वर जाईल, त्यामुळे संपूर्ण मुंबईवर लक्ष ठेवणं सोपं होणार आहे.
राज्यभरातील खासगी इमारतींमधील हे सीसीटीव्ही स्थानिक पोलीस ठाण्यांसोबतच सीसीटीव्ही सर्व्हेलन्स प्रकल्पातील डेटा सेंटरशी जोडले जाणार आहेत. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलत असल्य़ाचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्भया फंडातून मुंबईत सीसीटीव्ही प्रकल्प राबविण्यात येत आहेत. शहरातील धोकादायक जागांवर पथदिवे आणि सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. मुंबई सर्व्हेलन्स प्रकल्पाशी खासगी मॉल्स, दुकाने यांच्याही सीसीटीव्ही यंत्रणा जोडण्यात येणार आहे. राज्यातील इतर शहरांमध्येही लवकरच मोठा प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
ठाणे : मध्य रेल्वेच्या कळवा ते मुंब्रा स्थानकादरम्यान कळवा फ....
अधिक वाचा