By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 21, 2020 11:05 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
देशातील मदरशांमध्ये लहान मुलांमध्ये कट्टरतावाद आणि द्वेषभाव रुजवला जातो. याच मदरशांमध्येच दहशतवादी तयार होतात, असे वक्तव्य भाजप नेत्या उषा ठाकूर यांनी केले आहे. मदरशांमध्ये राष्ट्रवादाला सुसंगत असे शिक्षण दिले जात नाही. त्यामुळे सरकारने या मदरशांमधील प्रचलित शिक्षण पद्धती मोडून तेथील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणले पाहिजे, अशी मागणी उषा ठाकूर यांनी केली. सध्या पोटनिवडणुकांच्या निमित्ताने मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण तापले आहे. शिवराज सिंह चौहान सरकारमध्ये मंत्री असलेल्या उषा ठाकूर या मंगळवारी इंदौर येथील पत्रकारपरिषदेत बोलत होत्या. यावेळी उषा ठाकूर यांनी आसामच्या धर्तीवर देशातील सर्व मदरसे बंद करण्याची मागणी केली. संविधानाची स्वत:ची अशी वेगळी व्याख्या करणे योग्य नाही. विद्यार्थी हे विद्यार्थी असतात. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांची सामूहिक शिक्षण होणे गरजेचे असल्याचे उषा ठाकूर यांनी सांगितले.
All terrorists are raised in madrasas, they had turned J&K into a terror factory. Madrasas which can't comply with nationalism, they should be merged with existing education system to ensure complete progress of the society: Madhya Pradesh Minister Usha Thakur in Indore. (20.10) pic.twitter.com/1jQEgFBu2r
— ANI (@ANI) October 21, 2020
मदरशांमधील धर्माधारित शिक्षण लहान मुलांमध्ये कट्टरता आणि द्वेषभाव रुजवते. मदरशांमध्ये कोणती संस्कृती शिकवली जाते? आतापर्यंतची परिस्थिती पाहिल्यास सर्व कट्टरतावाद आणि दहशतवादी मदरशांमध्ये तयार झाल्याचे दिसून येईल. याच मदरशांमुळे जम्मू-काश्मीर दहशतवादाचा कारखाना झाला होता. त्यामुळे राष्ट्रवाद आणि समाजाच्या मुख्य प्रवाहाशी स्वत:ला जोडू न शकणाऱ्या मदरशांचे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात विलिनीकरण करावे. जेणेकरून संपूर्ण समाजाचा विकास होईल, असे मत उषा ठाकूर यांनी मांडले. आसाम सरकारने मदरसे बंद करून दाखवले. त्यामुळे सरकारने देशभरात राष्ट्रहिताच्या आड येणारी प्रत्येक गोष्ट बंदच केली पाहिजे, असेही उषा ठाकूर यांनी सांगितले.
राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर बहुतांश भागांमध्....
अधिक वाचा