ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन, सर्व रेल्वे गाड्याही 14 एप्रिलपर्यंत रद्द

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 25, 2020 12:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30

देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन, सर्व रेल्वे गाड्याही 14 एप्रिलपर्यंत रद्द

शहर : देश

देशात कोरोना विषाषूचा वाढता प्रादुर्भाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला 21 दिवसांसाठी लॉकडाऊन केलं जात असल्याचं घोषित केलं. या पार्श्वभूमीवर रेल्वेनेही सर्व प्रवासी आणि मालवाहतूक गाड्या 14 एप्रिलपर्यंत रद्द केल्या आहेत.

यादरम्यान, भारतीय रेल्वेच्या सर्व एक्स्प्रेस, पॅसेंजर, मेल आणि मालवाहतूक गाड्या रद्द राहणार आहेत. यापूर्वी रेल्वेने 31 मार्चपर्यंत सर्व प्रवासी गाड्या रद्द करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता देशात दिवसांच्या लॉकडाऊन दरम्यान येत्या 14 एप्रिलपर्यंत सर्व प्रवासी आणि मालवाहतूक गाड्या रद्द केल्याची घोषणा भारतीय रेल्वेने केली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी 22 मार्च रविवारी मध्यरात्रीपासून 31 मार्चपर्यंत मुंबई लोकलसेवेसह देशभरातील सर्व रेल्वे सेवा रद्द करण्यात आल्या. येत्या 31 मार्चपर्यंत लोकल तसेच, भारतीय रेल्वेच्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. कोरोना विषाणूचा वाढता धोका पाहता भारतीय रेल्वेने हा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यानंतर आता यामध्ये वाढ करुन 14 एप्रिलपर्यंतच्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन

“कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पुढचे 21 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. हे 21 दिवस नाही सांभाळलं तर आपला देश आणि आपण 21 वर्ष मागे जाऊ. अनेक कुटुंब उध्वस्त होतील. ही गोष्ट मी पंतप्रधान म्हणून नाही तर आपल्या परिवाराचा सदस्य म्हणून बोलत आहे. त्यामुळे बाहेर पडू नका, घरातच राहा”, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे मंगळवारी रात्री आठ वाजता पुन्हा एकदा जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी लॉकडाऊनची महत्त्वपूर्ण घोषणा केली.

“देशाला वाचवणं ही भारत सरकार, राज्य सरकार, प्रत्येक लोकप्रतिनिधी आणि पंतप्रधान म्हणून माझी प्राथमिकता आहे. त्यामुळे मी विनंती करतो, तुम्ही जिथे आहात तिथेच राहा. हा लॉकडॉऊन 21 दिवसांता असेल. याचा अर्थ 3 आठवड्यांचा असेल. येणारे पुढचे 21 दिवस फार महत्त्वाचे आहेत. कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी 21 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

मागे

सांगलीत एकाच कुटुंबातील 9 जणांना कोरोनाची लागण
सांगलीत एकाच कुटुंबातील 9 जणांना कोरोनाची लागण

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकट्या सांगली....

अधिक वाचा

पुढे  

संपूर्ण देशात लॉकडाऊन, कुठे काय सुरु आणि काय बंद?
संपूर्ण देशात लॉकडाऊन, कुठे काय सुरु आणि काय बंद?

जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत जगभरातील 140 पेक्षा अधिक....

Read more