ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मार्ग मोकळा, साकेत गोखलेंची याचिका हायकोर्टाने फेटाळली

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 24, 2020 05:29 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मार्ग मोकळा, साकेत गोखलेंची याचिका हायकोर्टाने फेटाळली

शहर : देश

अयोध्येमध्ये ऑगस्टला होणाऱ्या राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मार्ग मोकळा झाला आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका अलाहाबाद हायकोर्टाने रद्द केली आहे. साकेत गोखले यांनी ही याचिका दाखल केली होती.

अलाहाबाद हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत साकेत गोखले यांनी भूमिपूजनाचा कार्यक्रम हा अनलॉक- च्या गाईडलाईनचं उल्लंघन असल्याचं म्हणलं होतं. साकेत गोखलेंनी दाखल केलेल्या जनहित याचिकेमध्ये भूमिपूजन कोविड-१९ च्या अनलॉक-२च्या गाईडलाईनचं उल्लंघन आहे. भूमिपूजनाच्या कार्यक्रमात तीनपेक्षा जास्त लोकं एकत्र येतील, त्यामुळे नियमांचं उल्लंघन होईल, असं नमूद केलं होतं.

राम जन्मभूमिचा कार्यक्रम झाल्यास कोरोनाच्या संक्रमणाचा धोका वाढेल. कोरोनाच्या काळात गर्दी होईल, म्हणून बकरी ईदला सामूहिक नमाज पठणाला परवानगी दिलेली नाही, मग भूमिपूजनला परवानगी कशी दिली जाऊ शकते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करुन गृहमंत्रालयाच्या नियमांचं उल्लंघन केलं जात आहे, असं साकेत गोखले झी मीडियाशी बोलताना म्हणाले. साकेत गोखले हे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या जवळचे मानले जातात.

 

मागे

पहिली, दुसरी रोज 30 मिनिटं, तिसरी ते आठवी 45 मिनिटे 4 सत्रं, शाळांचं वेळापत्रक जाहीर
पहिली, दुसरी रोज 30 मिनिटं, तिसरी ते आठवी 45 मिनिटे 4 सत्रं, शाळांचं वेळापत्रक जाहीर

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या निर्ब....

अधिक वाचा

पुढे  

आता हा मुद्दा प्रतिष्ठेचा किंवा कौतुकाचा न करता मुंबईतील चाचण्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी विरोधी
आता हा मुद्दा प्रतिष्ठेचा किंवा कौतुकाचा न करता मुंबईतील चाचण्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी विरोधी

राज्य सरकारकडून मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याचे सांगण्....

Read more