ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मतपत्रिकांची हेराफेरी झाल्याचा आरोप, निवडणूक आयोगाकडे तक्रार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 19, 2020 10:36 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मतपत्रिकांची हेराफेरी झाल्याचा आरोप, निवडणूक आयोगाकडे तक्रार

शहर : औरंगाबाद

मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मतपत्रिकांची हेराफेरी झाल्याचा गंभीर आरोप पदवीधरचे उमेदवार सिद्धेश्वर मुंडे यांनी केला आहे. इतकंच नाही तर निवडणुकच्या चौकशीसाठी त्यांनी निवडणूक आयोगाकडेदेखील तक्रार दाखल केली आहे. न्याय न मिळाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची भूमिका सिद्धेश्वर मुंडे यांनी घेतली आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, झालेल्या मतदानापेक्षा 186 मतपत्रिका जास्त निघाल्या तर अनेक पत्रिका कोऱ्या असल्याचा सिद्धेश्वर मुंडे यांचा दावा आहे. मतदान केंद्राध्यक्षाच्या सह्यांमध्येही तफावत असल्याचा आरोप मुंडे यांनी केला आहे. यामुळे संपूर्ण मतपत्रिकांची तपासणी करण्याची मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यावर आता पुढे निवडणूक आयोग काय निर्णय घेणार आणि चौकशीतून काय समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

दरम्यान, औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सलग दोन वेळा विजयी ठरलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण (Satish Chavan) यांनी विजयाची हॅटट्रिक साधली. महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण पुन्हा एकदा विजयी झाले. सतीश चव्हाण यांना तब्बल 116638 मते मिळाली. तर भाजपच्या शिरीष बोराळकर यांना 58743 मतांवर समाधान मानावं लागलं आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण जवळपास 57895 मताधिक्क्यानं विजयी झाले.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीकडून सतीश चव्हाण तर त्यांच्याविरोधात भाजपचे शिरीष बोराळकर निवडणुकीच्या रिंगणात होते. सतीश चव्हाण हे सलग दोन वेळा औरंगाबाद पदवीधरच्या जागेवर निवडून आले होते. आता तिसऱ्यांदा सतीश चव्हाण यांनी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून विजय मिळवला. गेल्यावेळी सतीश चव्हाण यांच्याविरोधात बोराळकरच उभे होते. मात्र, तेव्हासुद्धा त्यांना पराभव पत्करावा लागला होता. मात्र, यंदा महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवत असल्यानं ती चुरशीची होत असल्याचं चित्र निर्माण झालं होतं, अखेर या अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण विजयी झाले.

मागे

नाशकात चालतंफिरतं 'शहीद स्मारक', तरुणानं शरीरावर गोंदवली 559 शहिदांची नावं
नाशकात चालतंफिरतं 'शहीद स्मारक', तरुणानं शरीरावर गोंदवली 559 शहिदांची नावं

देशासाठी शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली जाते. अमर रहेच्....

अधिक वाचा

पुढे  

जबरदस्त…. ‘या’ घातक क्षेपणास्त्रामुळे राफेल जेटची संहारक क्षमता वाढणार
जबरदस्त…. ‘या’ घातक क्षेपणास्त्रामुळे राफेल जेटची संहारक क्षमता वाढणार

भारतीय वायूदलात नव्यानेच दाखल झालेली राफेल लढाऊ विमाने (Rafael jets) आता पुन्हा एक....

Read more