ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जगाचे फुफ्फुस पेटतय

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 23, 2019 01:41 PM 2019-02-12T14:15:30+5:30

जगाचे फुफ्फुस पेटतय

शहर : विदेश

जगाला 20 % ऑक्सिजन देणारे, जगाचे फुफ्फुस म्हणून ओळख असेलेले ब्राजीलमधील पर्जन्य वनातील आगीने रौद्र रूप धरण केले आहे. जवळपास तीन आठवडे हे पर्जन्यवन जळत आहे. त्यामुळे आतापर्यंत हजारो पक्षी, प्राणी आणि वनस्पती जाळून खाक झाल्या आहेत.

उष्णकटिबधिय क्षेत्रातील हे सर्वात मोठे पर्जन्यवन आहे. ते 55 लाख चौ.फु.क्षेत्रात पसरलेले आहे. दक्षिण अमेरिकेतील ब्राजील, बोलविया, पेरु, इक्वाडोर, कोलंबिया, व्हेनेझूएला, गयाणा,फ्रांस या देशांना लागून हे पर्जन्यवन आहे. येथे कायम पाऊस पडत असतो. म्हणून त्याला 'पर्जन्यवन' म्हणतात. सूर्याची किरण न पसरणारी क्षेत्र ॲमेझॉनमध्ये आहे. या पर्जन्यवनात 40 हजारांपेक्षा जास्त वनस्पतीच्या जाती, 1 हजार 300 पक्षांच्या जाती, 3 हजार प्रकारांचे मासे, 430 सस्तन प्राणी आणि तब्बल 25 लाख  विविध किटकांच वास्तव्य आहे. इलेक्ट्रिक्स इल्स, फ्लेश इटिंग पिरान्हा, विषारी बेडूक, जग्वार अशा हिंस प्राण्यांसह विविध विषारी सापांच या वनात वास्तव्य आहे. फक्त प्राणी आणि वनस्पतीच नव्हे तर 400 ते 500 जमातींचे इथे वास्तव्य येथे आहे.

ॲमेझॉन नदी प्रती सेकंदाला 55 दशलक्ष ग्यालन पाणी अटलांटिक सागरात सोडते. पश्चिमेकडून येणार्‍या 25 टके औषधांमध्ये ॲमेझॉन पर्जन्यवनातील साहित्याचा वापर होतो. शास्त्रज्ञांनी ॲमेझॉनमध्ये अजून 1 टक्केही वनस्पतींची चाचणी पूर्ण केलेली नाही. तरीही 25 टक्के औषधांचा फायदा होतो.

यूरोपियन यूनियन च्या सैटेलाइटने जारी केलेल्या छायाचित्रानुसार आगीचा धूर संपूर्ण अटलांटिक किनार्‍यावर पसरलाय तर धुराच साम्राज्य ब्राजीलमधील निम्या भागात पसरल असून शेजारील पेरु, बोलविया आणि पेरूग्वे मध्येही धूर पसरत आहे.

पर्यावरणप्रेमी गेल्या अनेक वर्षापासून ॲमेझॉन पर्जन्यवन वाचविण्यासाठी आंदोलन करीत आहेत. पण ब्राजील सरकारने याकडे दुर्लक्ष करीत वनतोडीसाठी परवानग्या दिल्या. आणि कोणतीही उपाययोजना तयार केली नाही, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. तर जगाची वनसंपती नष्ट होत असल्याने ब्राजील सरकारवर युरोपसह अनेक देशांनी टीका सुरू केली आहे. ब्राजीलच्या अंतराळ संशोधन संस्थेने (आयएनपीई) 2013 मध्ये वनातील आगीवर लक्ष ठेवण्यास सुरवात केली. तेव्हापासून मोठ्या प्रमाणात आगीच्या घटना नोंदविण्यात आल्या. ब्राजीलमध्ये या वर्षात 72 हजार 843 आगीच्या घटना घडल्या. गेल्यावर्षी याच काळातील आगीच्या घटनाशी तुलना केली तर ही 80 टक्के आहे.

दरम्यान अतिशय गंभीर अशा या परिस्थितीविषयी सेलिब्रिटीनीही चिंता व्यक्त करण्यास सुरवात केली असून ही आग शमली नाही, तर आपल्या प्रत्येकाच्या जीवनावर या सार्‍याचे गंभीर परिणाम होणार असल्याचे वास्तव बॉलीवुडचा अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांनी सर्वासमोर आणल आहे.

 

मागे

एसटीच्या वाहक चालक परीक्षा निकालात घोळ
एसटीच्या वाहक चालक परीक्षा निकालात घोळ

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने 2018-19 यावर्षी घेतलेल्या परीक्षेच्....

अधिक वाचा

पुढे  

लोकनाथ मंदिराची भिंत कोसळून चौघांचा मृत्यू,27 जखमी
लोकनाथ मंदिराची भिंत कोसळून चौघांचा मृत्यू,27 जखमी

आज संपूर्ण देशात भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे. मा....

Read more