By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 15, 2020 03:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
नवी दिल्ली - लघु आणि मध्यम उद्योजकांच्या डिजिटलायझेशनसाठी ऍमेझॉन १ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. येत्या काळात पुढील पाच वर्षांत १० अब्ज डॉलरच्या भारतीय वस्तूंची निर्यात तसेच भारतीय उत्पादकांना जागतिक बाजारपेठेत दरवाजे खुले करण्याचे आवाहन ऍमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझॉस यांनी केली आहे.
भारतात ई-कॉमर्स व्यवसाय दिवसेंदिवस वाढत असून लोकप्रिय होत आहे. बेझॉस हे आज भारत दौ-यावर आले असताना ऍमेझॉनने आयोजित केलेल्या लघु उद्योजकांच्या परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. अॅमेझॉनच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भारतीय वस्तूंना जागतिक बाजारपेठ उपलब्ध केली जाईल व त्यातूनच येत्या पाच वर्षांत १० अब्ज डॉलरच्या वस्तूंची निर्यात केली जाईल, अशी ग्वाही देत आम्ही यासाठी प्रयत्नशील आहोत असं त्यांनी म्हंटले आहे.
बेझॉस हे भारताच्या दोन दिवसीय दौ-यात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार आहेत. या भेटीत व्यवसायिकांना जाचक ठरत असलेल्या नियमावली बाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच बेझॉस यांनी सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या वक्तव्याकडे सर्वांच्याच नजरा खिळून बसल्या आहेत.
जम्मू : जम्मू-कश्मीरमधील इंटेरनेटसह इतर बंदी हटविण्याचे आदेश स....
अधिक वाचा