By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 29, 2020 08:05 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
देशात कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सॅम्पल्स टेस्ट कीट कमी पडतायत. त्यावर पुण्यातल्या 'माय लॅब' डिस्कवरी सोल्युशन्स कंपनीनं संशोधन करुन मेड इन इंडिया टेस्ट किट विकसीत केलं. या टेस्टिंग किटला इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि सेंट्रल ड्रग स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन या संस्थांची मान्यता देखील मिळाली. यानंतर आता नवे किट समोर आले आहे. यामुळे केवळ पाच मिनिटांमध्ये व्यक्तीला कोरोनाची लागण झाली की नाही ? हे कळू शकणार आहे. अमेरिकेतील प्रयोगशाळेत याचा यशस्वी प्रयोग झाला आहे. हे वजनाने कमी असल्याने नेआण करण्यास सोपे आहे.
अन्न आणि औषध विभागाने याला मंजुरी दिल्याचे अमेरिकेच्या एबॉट प्रयोगशाळेने सांगितले. लवकरात लवकर म्हणजे पुढच्याच आठवड्यात जनतेसमोर हे किट आणण्यास मंजुरी मिळाली आहे.
दिवसाला १ हजार नमुने
पुण्याच्या लॅबकडे एका आठवड्यात एक लाख किट्स बनवण्याची लॅबची क्षमता आहे. एका किटमध्ये १०० टेस्ट होणार आहेत. एका लॅबमध्ये दिवसाला १००० नमुने तपासणं शक्य होणार आहे. परदेशातून येणाऱ्या किटसच्या तुलनेत या किटची किंमत फक्त एक चतुर्थांश आहे. या किटच्या मदतीनं फक्त अडीच तासात रिपोर्ट येणार असल्याचे कार्यकारी संचालक शैलेंद्र कवाडे यांनी सांगितले.
सध्या आपल्या देशात ही टेस्टिंग किटस जर्मनीमधून मागवली जात होती. दिवसाला केल्या जाणाऱ्या टेस्टच्या संख्येत भारत सध्या पिछाडीवर आहेपण माय लॅबच्या या संशोधनामुळे कोरोनाविरोधातल्या लढ्यात अत्यंत मोलाची मदत झालीय.
कोरोनाचं संकट आणि लॉकडाऊन या दरम्यान देशाची बँकिंग व्यवस्था सुधारण्यासाठ....
अधिक वाचा