By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 12, 2021 11:28 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
मोदी सरकारने कोरोना लसीकरणानंतर वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची (CAA) अंमलबजावणी करण्याची घोषणा केलीय. स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबत माहिती दिलीय. ते पश्चिम बंगालमधील निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचारसभेत बोलत होते. यानंतर मोदी सरकार पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी हिंदू निर्वासितांच्या मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी ही घोषणा करत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे (Amit Shah declare that will implement CAA after corona vaccination).
नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे 2015 पूर्वी बांग्लादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून आलेल्या गैरमुस्लीम नागरिकांशिवाय पश्चिम बंगालमधील मातोआ समुहाच्या नागरिकांना फायदा होईल, असं अमित शाह यांनी नमूद केलंय. यावेळी अमित शाह यांनी विरोधकांच्या आरोपांनाही उत्तर दिलं. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या अंमलबजावणीमुळे भारतातील अल्पसंख्याक नागरिकांच्या नागरिकत्वावावर काहीही परिणाम होणार नाही. विरोधक नागरिकांची दिशाभूल करत आहे, असं मत शाह यांनी व्यक्त केलं. असं असलं तरी हा कायदा धर्माच्या आधारावर भेदभाव करतो हा आरोप वारंवार होतोय.
যখন বলেছিলাম যে ২০ টিরও বেশি আসনে জিতব, তখন মমতাদি বলেছিলেন যে আমরা শূন্য আসন পাবো।আমি আপনাদের বলতে এসেছি যে মমতাদি আজ হারের ভয়ে নিজেই আসনের সন্ধান করছেন,এখান থেকে লড়বে না ওখান থেকে লড়বে, একটি আসনে লড়বে না দুটি আসনে লড়বে ঠিক করতে পারছেন না। #PoribortonInBengal pic.twitter.com/ZEDNZP1bOE
— Amit Shah (@AmitShah) February 11, 2021
शाह म्हणाले, “मोदी सरकारने 2018 मध्ये नागरिकत्व कायदा आणण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याप्रमाणे 2019 मध्ये मोदी सरकार पुन्हा एकदा सत्तेवर आल्यावर हा कायदा आणण्यात आला. मात्र, देशात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या कायद्याची अंमलबजावणी प्रलंबित होती. ममता बॅनर्जी म्हणतात की आम्ही खोटं आश्वासन दिलं. त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध केलाय आणि याची अंमलबजावणी होऊ देणार नाही असं म्हटलंय. मात्र, भाजप दिलेली आश्वासनं नेहमीच पूर्ण करतं. आम्ही हा कायदा आणलाय आणि निर्वासितांना नागरिकत्व देऊ.”
देशातील कोरोना लसीकरण पूर्ण झाल्यानंतर लगेचच नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी सुरु होईल, असंही शाह यांनी नमूद केलं.
धौलीगंगा नदीचा जलस्तर काल गुरुवारी पुन्हा वाढला. त्यामुळे गेल्या चार दिवसा....
अधिक वाचा