ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

खासदार नवनीत कौर राणा यांना कोरोनाची लागण

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 06, 2020 05:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30

खासदार नवनीत कौर राणा यांना कोरोनाची लागण

शहर : अमरावती

अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे . त्यांच्या घरातील आतापर्यंत 11 सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये नवनीत राणा यांच्या दोन्ही मुलांचा आणि सासू-सासऱ्यांचा समावेश आहे. नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हे कुटुंबातील सदस्यांच्या संपर्कात होते. त्यामुळे नवनीत राणांनंतर रवी राणा यांचादेखील रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आमदार रवी राणा यांचे वडील, म्हणजेच नवनीत कौर राणा यांचे सासरे गंगाधर राणा यांचा कोरोना रिपोर्ट 2 ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर राणा दाम्पत्य, त्यांची मुले आणि कुटुंबातील इतर सदस्य, कार्यकर्ते अशा जवळपास 50 ते 60 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली.

आमदार रवी राणा यांच्या वडिलांसोबतच आई, मुलगा, मुलगी, बहिण, बहिणीचे पती, भाचा, पुतण्या अशा एकूण दहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं. रवी राणा यांच्या आई-वडिलांवर नागपूरच्या एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिथे नवनीत राणा आणि रवी राणादेखील गेले होते. सासू-सासरे आणि मुलांच्या संपर्कात आल्यामुळे नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाली. दरम्यान, रवी राणा यांचा कोरोना रिपोर्ट प्रतीक्षेत आहे.

अमरावती येथील आरोग्य यंत्रणा पार ढासळली आहे. कोव्हिड रुग्णांचे हाल होत आहेत. कोव्हिड तपासणी करणाऱ्या खाजगी, कंत्राटी व्यक्तींची पार्श्वभूमी तपासून पाहली पाहिजेअसा आरोप खासदार नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांनी सॅनिटायझर, मास्क आणि धान्य वाटण्यासाठी एप्रिल महिन्यात दौरे केले होते. नवनीत कौर राणाही यामध्ये सहभागी होत्या. त्यावेळी (एप्रिल महिन्यात) रवी राणा यांना 103-104 या श्रेणीत ताप आला. त्यामुळे त्यांच्या शरीरभर असह्य वेदना जाणवू लागल्या होत्या. तेव्हा त्यांना खासगी रुग्णालयात ॅडमिट करण्यात आले होते, परंतु त्यांना कोरोनाची लागण झाली नव्हती.

नवनीत कौर राणा या अमरावती मतदारसंघातून लोकसभेवर अपक्ष निवडून गेल्या आहेत. शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांचा धुव्वा उडवत नवनीत कौर निवडून आल्या आहेत. तर त्यांचे यजमान आणि युवा स्वाभिमान पक्षाचे नेते रवी राणा हे बडनेरा मतदारसंघातून पुन्हा एकदा आमदारपदी निवडून आले आहेत. त्यांनीही शिवसेना उमेदवाराचाच पराभव केला. शिवसेनेच्या संजय बंड यांच्या पत्नी प्रिती यांना रवी राणांनी पराभवाची धूळ चारली होती.

 

मागे

'दैनिक पुण्यनगरी'चे संस्थापक-संपादक बाबा शिंगोटे यांचे निधन
'दैनिक पुण्यनगरी'चे संस्थापक-संपादक बाबा शिंगोटे यांचे निधन

‘दैनिक पुण्यनगरी’चे संस्थापक-संपादक मुरलीधर अनंता उर्फ बाबा शिंगोटे या....

अधिक वाचा

पुढे  

Gold Rate: सोन्याच्या दरांची प्रति तोळा 60 हजारांकडे वाटचाल
Gold Rate: सोन्याच्या दरांची प्रति तोळा 60 हजारांकडे वाटचाल

सोन्याचे भाव आकाशाला भिडत आहेत. बुधवारी एमसीएक्समध्ये 10 ग्रॅम सोन्याची किं....

Read more