By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 01, 2020 02:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : सातारा
सातारा - पुणे-बेंगळूर महामार्गावर तेलाचा टँकर उलटल्याची धक्कादायक घटना नवीन वर्षाच्या जल्लोषात असताना पहाटे-पहाटे झाली. सातार्यााजवळील शेंद्रे गावच्या हद्दीत ही घटना झाल्याचे कळले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे पुणे-बेंगळूर महामार्गावर शेंदे गावाच्या हद्दीत कोल्हापूरकडे जाणारा तेलाचा टँकर विरुद्ध दिशेला जाऊन मोटारीवर जोरात आदळला. त्यानंतर टँकर पलटी होऊन रस्त्यावर जोरात आदळला. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या तेल गळती झाली असून नुकसान झाले आहे. अपघातामुळे काही वेळ या मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच सातारा महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहन बाजूला करत त्यांनी वाहतूक सुरळीत केली. या अपघातात मोटारीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तेलाच्या टँकर ला बाजूला करण्यात आले आहे. तसेच या घटनेचा सातारा पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
आत्तापर्यंत ज्यांनी आधारकार्डशी पॅन लिंक केले नाही त्यांना दिल....
अधिक वाचा