By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 12, 2019 01:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आज अनंत चतुर्दशीला मोठ्या उत्साहात सर्वत्र श्री गणेशाच्या मूर्ति वाजतगाजत मिरवणुकीने जलाशयात विसर्जनासाठी नेण्यात येत आहे. उद्या पहाटेपर्यंत हा श्री गणेश मुर्तिचा विसर्जन सोहळा चालणार आहे. मोठ्या भक्तिभावाने तमाम भाविक गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अस आवाहन श्री गणरायाला करीत आहेत. अर्थात भाविकांची ही विनंती लक्षात घेऊन श्री गणराय पुढच्या वर्षी 11 दिवस आधीच म्हणजे 22 ऑगस्ट 2020 लाच येणार आहे, अशी माहिती पंचागकर्ते खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी दिली आहे.
सोमण यांनी सन 2025 पर्यंतचा प्रत्येक वर्षी बाप्पाचे आगमन कधी होणार याचीही माहिती दिली आहे. त्यानुसार शुक्रवार 10 सप्टेंबर 2021, बुधवार 31 ऑगस्ट 2022, मंगळवार 19 सप्टेंबर 2023, शनिवार 7 सप्टेंबर 2024 आणि बुधवार 27 ऑगस्ट 2025 रोजी श्री गणेश चतुर्थी येणार आहे.
मुंबई आज सकाळ पासूनच्या लाडक्या बाप्पाच्या विसर्जण मिरवणुकीला सुरवात झाल....
अधिक वाचा