By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 08, 2019 02:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई शहर आणि उपनगरात सकाळ पासूनच मुसळधार पावसाळा सुरवात झाली त्यामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला असून पश्चिम द्रुतगती मार्गावर दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी झाली आहे. गोवंडीत शिवाजी नगर परिसरात दुमजली इमारतीचा वरचा भाग कोसळून 8 जन जखमी झाले आहेत. जखमींवर राजवाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अंधेरीत एमआयडीसीच्या मालपा डोंगरी परिसरात पेपर बॉक्स इंडस्ट्री ची सरक्षक भिंत कोसळली . यात एक महिला अडकल्याचे म्हटले जाते. या महिलेचा शोध घेण्यात येत आहे.
गेल्या आठवडा भर दाणादाण उडविणार्या पावसाने सकाळपासून जोरदार सुरुवात केली. साहजिकच सकाळी कामावर जाणारे चाकरमानी ठिकठिकाणी अडकले होते. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर 10 ते 15 मिनिटे उशिराने लोकल धावत आहेत. मध्य रेल्वे मार्गावर सायन , विक्रोळी, कंजूरमार्ग स्थांकदरम्यान रुळावर पाणी साचले होते. या पावसाचा बेस्ट वाहतुकीचा फाटका बसला. अनेक मार्गावरील बेस्ट ची वाहतूक अन्य मार्गांवर वळविण्यात आली आहे. अंधेरी सबवे मध्ये पाणी भरले. पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. विमान वाहतुकही काही काळ विस्कळीत झाली होती. येत्या 24 तासात मुंबईसह उपनगरात काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची श्यक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
मरीन ड्राइव जवळ समुद्रात शनिवारी दुपारी बुडालेल्या साहिल खान या 14 वर्षाच्य....
अधिक वाचा