By PRATIMA LANDGE | प्रकाशित: एप्रिल 05, 2019 03:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : satana
तब्बल आठ दिवसांपासून बंद असलेल्या सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लिलाव आज सुरळीत होण्यापूर्वीच कांदा व्यापार्यानी कांदा लिलाव सुरू न केल्याने कांदा व्रिकीसाठी आलेल्या संतप्त कांदा उत्पादकांनी बाजार समिती कार्यालयाबाहेर घोषणा देऊन सटाणा-मालेगाव राज्य महामार्गावर उतरून रास्ता रोको केला.
सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार २८ मार्च ते ३ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आले होते. ४ एप्रिल रोजी लिलाव घेऊन परत आज अमावस्येनिमित्त बाजार समितीमधील व्यापार बंद ठेवण्यात येणार आहे तर ८ एप्रिलपासुन दैनंदिन लिलाव सुरू होणार होते.
गुरुवारी सकाळी तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी वर्गाने आपला साठविलेला नवीन कांदा विक्रीसाठी बाजार समिती आवारात आणला होता. मात्र बाजार समिती प्रशासनाने लिलावात भाग घेणार्या व्यापार्यांना आपल्या परवान्यामधील तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासंदर्भात सूचित केले होते. यामुळे बाजार समिती प्रशासन व व्यापारीवर्गात समन्वय न होऊ शकल्याने सकाळी कांदा लिलावास प्रारंभ होऊ शकला नसल्याचे एका व्यापार्याने सांगितले.
मी सुबोध भावे यांच्यासारखा दिसतो असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पु....
अधिक वाचा