ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अनिल अंबानींची दैना; घरातले सर्व दागिने विकले, मुलाकडूनच कर्ज घेण्याची वेळ

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 26, 2020 01:53 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अनिल अंबानींची दैना; घरातले सर्व दागिने विकले, मुलाकडूनच कर्ज घेण्याची वेळ

शहर : मुंबई

गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या आर्थिक संकटात सापडलेले उद्योगपती अनिल अंबानी यांची अवस्था आणखीनच बिकट झाल्याचे समोर आले आहे. अनिल अंबानी यांना आता त्यांच्याविरुद्धचे कायदेशीर खटले लढणेही अवघड होऊन बसले आहे. हे खटले लढवण्यासाठी अनिल अंबानी यांना आपल्या घरातील सर्व दागिने विकून टाकावे लागले. तसेच सध्या खर्चासाठीही त्यांच्यावर मुलाकडून कर्ज घेण्याची वेळ आली आहे.

अनिल अंबानी यांनी शुक्रवारी लंडन येथील न्यायालयाला ही माहिती दिली. चिनी बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकवल्याप्रकरणी सध्या लंडन येथील न्यायालयात खटला सुरु आहे. या बँकांनी अनिल अंबानी यांच्याकडे पैशासाठी तगादा लावला आहे. अनिल अंबानी यांच्याकडे अनेक महागड्या गाड्या असल्याचे या बँकाचे म्हणणे आहे. यासंदर्भात शुक्रवारी झालेल्या सुनावणीत अनिल अंबानी यांना विचारणा करण्यात आली. त्यावेळी अनिल अंबानी यांनी आपण सध्याच्या घडीला अत्यंत साधे जीवन जगत असल्याचे सांगितले. मी धूम्रपान आणि मद्यसेवनही सोडले आहे. मी अलिशान जीवन जगत असल्याच्या गोष्टी ही प्रसारमाध्यमांची निर्मिती आहे.

वकिलांची फी आणि इतर कायदेशीर खर्चासाठी जानेवारी ते जून या कालावधीत घरातील सर्व दागिने विकावे लागले. दागिन्यांच्या विक्रीतून आपल्याला ९.९ कोटी रुपये मिळाले होते. यानंतर आता माझ्याकडे देण्यासारखे फारसे काही उरलेले नाही. तसेच माझ्याकडे अलिशान गाड्यांचा ताफा असल्याची प्रसारमाध्यमांतील वृत्ते ही अतिरंजित आहेत. माझ्याकडे कधीच रोल्स रॉईस कार नव्हती. सध्या माझ्याकडे केवळ एकच कार उरली आहे. तसेच रोजच्या खर्चासाठीही मी मुलाकडून कर्ज घेतल्याचा खुलासा अनिल अंबानी यांनी केला.

अंबानी यांनी चीनमधील तीन ४ हजार ७६० कोटीचे बँकांकडून कर्ज घेतल आहे. त्याची वसुली करण्यासाठी या बँकांनी लंडनमधील न्यायालयात अंबानी यांच्या विरोधात खटला दाखल केला आहे. या बँकांनी कर्जाच्या वसुलीसाठी अनिल अंबानी यांची मालमत्ता जप्त करण्याची परवानगी मागितली आहे.

मागे

WhatsAppवर चुकीने पाठविलेले मेसेजेस महिन्यानंतरही डिलीट केले जाऊ शकतात, या सोप्या स्टेप्सला फॉलो करा
WhatsAppवर चुकीने पाठविलेले मेसेजेस महिन्यानंतरही डिलीट केले जाऊ शकतात, या सोप्या स्टेप्सला फॉलो करा

इन्स्टंट मेसेजिंग एप आजकाल आपल्या आयुष्यात व्हॉट्सएपचा खूप वापर केला जातो.....

अधिक वाचा

पुढे  

आरोग्य मंत्री राजेश टोपेंचा ताफा भाजपच्या कार्यकर्त्यांनी रोखला
आरोग्य मंत्री राजेश टोपेंचा ताफा भाजपच्या कार्यकर्त्यांनी रोखला

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या गाड्यांचा ताफा भाजप युवा मोर्चाच्या कार्....

Read more