ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अॅपलची विक्री घटल्याने टिम कुक यांना मोठा दणका

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 04, 2020 07:31 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अॅपलची विक्री घटल्याने टिम कुक यांना मोठा दणका

शहर : विदेश

        सॅन फ्रान्सिस्को - Apple ची वार्षिक विक्री कमी झाल्याचा परिणाम कंपनीचे सीईओ टिम कुक यांच्या वार्षिक वेतनावरही झाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांचं वार्षिक वेतन २०१९ मध्ये कमी होऊन ११६ लाख डॉलर (जवळपास ८३ कोटी रुपये) वर आलं आहे. यापूर्वी २०१८ मध्ये त्यांचं वार्षिक वेतन १५७ लाख डॉलर म्हणजेच जवळपास ११२ कोटी रुपये होतं. कंपनीने अमेरिकेतील बाजार नियामक संस्था सिक्युरिटीज अँड एक्स्चेंजला याबाबत माहिती दिली.


          टिम कुक यांना दिल्या जाणाऱ्या एकूण रक्कमेत कपात होण्याचं कारण म्हणजे त्यांचा प्रोत्साहन भत्ता (इन्सेन्टिव्ह बोनस) कमी झाला आहे. कंपनीनेच याबाबतची माहिती दिली. २०१८ मध्ये त्यांना १२० लाख डॉलर एवढा प्रोत्साहन भत्ता मिळाला, जो २०१९ मध्ये ७७ लाख डॉलरवर आला. कंपनीने २०१८ मध्ये ठरवलेल्या लक्ष्यापेक्षा १०० टक्के अधिक विक्री केली होती. पण २०१९ मध्ये ठरवलेल्या लक्ष्यापेक्षा २८ टक्के कमी विक्री झाली.


       टिम कुक यांचं मूळ वेतन ३० लाख डॉलर आहे. याशिवाय त्यांना कंपनीकडून कामगिरीच्या आधारावर प्रोत्साहन भत्ता दिला जातो. कंपनीने सुरक्षा आणि इतर कामं चांगली व्हावी यासाठी कुक यांना खाजगी विमानही दिलेलं आहे. वेतनाशिवाय कुक यांच्याकडे कंपनीचे प्रमुख म्हणून ११.३० कोटी डॉलरचे Apple शेअरही आहेत.


         Apple फोनसोबतच नवनवीन प्रोडक्ट आणण्यावरही भर देत आहे. नुकतीच कंपनीने Apple प्लस टीव्ही ही सेवाही सुरू केली आहे. Apple TV Plus ही सेवा जगातील १०० पेक्षा जास्त देशांमध्ये उपलब्ध आहे. काही वृत्तांनुसार, Apple टीव्ही प्लस ४० पेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध असेल. यातील कार्यक्रम डब किंवा टायटलसह दाखवले जातील. ही सेवा आयफोन, आयपॅड, Apple टीव्ही, आयपॉड टच, मॅक यासह tv.apple.com वरही उपलब्ध आहे.


         भारतीय बाजारातील स्पर्धा पाहता Apple ने दर अत्यंत कमी ठेवले आहेत. अमेरिकेतील दर हा ४.९९ डॉलर (साधारणपणे ३५० रुपयांपेक्षा जास्त) आहे, तर भारतातील ग्राहकाकडून फक्त ९९ रुपये घेतले जातील. इतर व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मच्या तुलनेत नेटफ्लिक्सचा दर ४९९ प्रति महिना आहे. 


         तर नेटफ्लिक्सच्या ओन्ली मोबाइलसाठीही १२९ रुपये द्यावे लागतात. अमेझॉन प्राइमसाठी शुल्क १२९ रुपये प्रति महिना आहे. विशेष म्हणजे Apple ग्राहकांना मोफत कनेक्शनही देत आहे. नवीन आयफोन, आयपॅड, Apple टीव्ही, आयपॉड टच किंवा मॅक खरेदी केलेल्या ग्राहकांना ही ऑफर मिळेल.
 

मागे

एचडीएफसी बॅंक धारकांना आनंदाची बातमी वाचा...
एचडीएफसी बॅंक धारकांना आनंदाची बातमी वाचा...

         नवी दिल्ली - आपल्या हक्काचे घर असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. ....

अधिक वाचा

पुढे  

जनगणना काम नाकारल्यास तुरूंगवास 
जनगणना काम नाकारल्यास तुरूंगवास 

       नवी दिल्ली - राज्य सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मच....

Read more