By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 10, 2019 11:44 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महाराष्ट्र परिचारिका अधिनियम 1966 मध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र परिचारिका (सुधारणा) अध्यादेश 2019 लागू करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
राज्यातील परिचारिकांची नोंदणी व प्रशिक्षण यांचे विनियमन करणाऱ्या विधिंचे एकत्रिकरण करण्यासाठी महाराष्ट्र परिचारिका अधिनियम, 1966 राज्यामध्ये लागू केला आहे. या अधिनियमाच्या कलम 3 प्रमाणे परिषदेची प्रस्थापना करण्यात येते. राज्यातील नोंदणीकृत परिचारिका संवर्गातील विहित पध्दतीने निवडून आलेल्या व्यक्ती आणि शासन नामनिर्देशित व्यक्तींची मिळून परिषदेची संरचना करण्यात आली आहे.
नंतरच्या काळात राज्यातील पदविकास्तरीय शुश्रूषा व परावैद्यक शिक्षणासंबंधीच्या बाबींचे नियमन करण्यासाठी 1 सप्टेंबर, 2018 च्या अधिसूचनेन्वये राज्य शुश्रूषा व परावैद्यक शिक्षण मंडळ स्थापित करण्यात आले आहे. त्यामुळे आता पदविका संस्थांना मान्यता किंवा संलग्नता देणे व परिक्षा विषयक कामकाज परिचारिका परिषदेकडून नव्याने स्थापित झालेल्या मंडळाकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे परिचर्या परिषदेकडे फक्त परिचारिकांच्या नोंदणीचे कामकाज राहीले आहे. त्यामुळे परिषदेवर राज्यातील परिचारिकांव्यतिरिक्त अन्य जास्त सदस्यांची आवश्यकता नाही. तसेच परिचर्या व्यवसायाच्या हिताच्या दृष्टीने या परिषदेवर परिचारिकांना जास्तीत जास्त प्रतिनिधीत्व देणे आवश्यक असल्याने परिषदेच्या संरचनेमध्ये बदल करणे आवश्यक झाले आहे. तसेच या अधिनियमातील विविध कलमांत नोंदणी फी, सदस्यत्वाची अनर्हता, दंडाच्या रक्कमा, शिक्षा इत्यादींच्या तरतुदी करण्यात आल्या आहे. या तरतुदी अत्यंत जुन्या असल्याने त्यात काळानुरूप सुधारणा करणे आवश्यक आहे.
सद्यस्थितीत परिषदेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. परिचारीकांना परिषदेमध्ये पुरेशे प्रतिनिधीत्व देण्यासाठी आणि परिचरीका व्यवसायाच्या हितासाठी अध्यादेश प्रख्यापित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार महाराष्ट्र परिचारीका अधिनियम 1966 मधील संबंधित कलमांत सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत राज्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यां....
अधिक वाचा