By
DAYANAND MOHITE | प्रकाशित:
ऑगस्ट 08, 2019 05:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : कोल्हापूर
वैभववाडी-कोल्हापूर या रेल्वेमार्गाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. गेले दोन वर्ष हा प्रकल्प रखडला होता. यापूर्वी मार्च महिन्यात रेल्वे बोर्डाने या मार्गाला अंतिम मंजुरी दिली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारने या मार्गाला मंजुरी दिली असून पुढील पाच वर्षांमध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांना याचा फायदा होणार आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, लातूर, बीड, सोलापूर तर कर्नाटकातील बेळगाव, बेल्लारी आणि गुलबर्गा या जिल्ह्यातून हा मार्ग जाणार आहे. तसेच या नव्या मार्गासाठी अंदाज 3 हजार 439 कोटी रुपयांचे खर्च येणार आहे. या नव्या रेल्वेमार्गामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडला जाणार असून मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीला याचा फायदा होईल.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या 108 किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचे काम बऱ्याच काळापासून रखडले होते. तात्कालिन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाला गती दिली होती. तसेच एका कंपनीला त्या मार्गाच्या प्राथमिक सर्वेक्षणाचे कामही देण्यात आले होते. त्यानंतर या मार्गाचा सॅटलाईट सर्व्हे करण्यात आला होता.