ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

...तर उद्धव ठाकरेंना अटक करणार का; सर्वोच्च न्यायालयात हरीश साळवेंचा युक्तिवाद

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 11, 2020 04:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30

...तर उद्धव ठाकरेंना अटक करणार का; सर्वोच्च न्यायालयात हरीश साळवेंचा युक्तिवाद

शहर : देश

रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी (Arnab goswami ) यांच्या अंतरिम जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीत वकील हरीश साळवे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. काही दिवसांपूर्वी एसटीच्या कर्मचाऱ्याने वेतन न मिळाल्यामुळे आत्महत्या केली. मुख्यमंत्र्यांनी पगार न दिल्यामुळे या कर्मचाऱ्याला आत्महत्या करावी लागली. मग आता पोलीस उद्धव ठाकरे यांना अटक करणार का, असा सवाल अर्णव गोस्वामी यांचे वकील हरीश साळवे यांनी उपस्थित केला. सर्वोच्च न्यायालयात आज अर्णव गोस्वामी यांच्या अंतरिम जामिनासाठी सुनावणी होत आहे. यावेळी अर्णव गोस्वामी यांच्या बाजूने ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी युक्तिवाद केला. अर्णव गोस्वामी यांना ज्याप्रकारे अटक झाली, ती अटक करण्याची पद्धत आहे का? अशाप्रकारे अटक करायला अर्णव गोस्वामी हे खुनी किंवा दहशतवादी आहेत का, असा सवाल हरीश साळवे यांनी उपस्थित केला.

हा सदोष मनुष्यवधाचा खटला नाही. अन्वय नाईक आत्महत्याप्रकरण मे 2020 पर्यंत शांत होते. त्यानंतर 21 एप्रिलला अर्णव गोस्वामी यांनी रिपब्लिक चॅनेलवरुन पालघरमधील साधुंच्या हत्येप्रकरणी राज्य सरकारवर टीका केली. यानंतर 26 एप्रिलला अन्वय यांच्या पत्नी अक्षता यांनी राज्य सरकारला तपास सुरु करण्यासंदर्भात पत्र लिहले. त्यामुळे याप्रकरणात राज्य सरकार सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचे स्पष्ट होत असल्याचे हरिश साळवे यांनी म्हटले. तसेच अन्वय नाईक यांनी त्यांच्या आईची हत्या करून आत्महत्या केल्याचेही हरीश साळवे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला.

अर्णव गोस्वामींच्या जामिनावर सुप्रीम कोर्टात इतक्या तातडीने सुनावणी कशी होते?

रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी (Arnab goswami ) यांच्या जामिनाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होत असलेल्या तातडीच्या सुनावणीवर बार कौन्सिलचे अध्यक्ष दुष्यंत दवे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अर्णव गोस्वामी यांना लगेचच कशी सुनावणी मिळते. अर्णव गोस्वामी यांच्यावर इतकी मेहरबानी का, असा सवाल दुष्यंत दवे यांनी उपस्थित केला आहे.

 

मागे

नरेंद्र पाटील यांची 'या' महामंडळावरुन हकालपट्टी, कांदा-बटाटा-मसाला मार्केट बंद
नरेंद्र पाटील यांची 'या' महामंडळावरुन हकालपट्टी, कांदा-बटाटा-मसाला मार्केट बंद

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माथाडी कामगारांनी (Mathadi workers) बंद पुकारला ....

अधिक वाचा

पुढे  

Arnab Goswami | अर्णव गोस्वामींना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
Arnab Goswami | अर्णव गोस्वामींना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामींना  सर्वोच्च न्यायालयाकडून दि....

Read more