ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Arnab Goswami | अर्णव गोस्वामींना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 11, 2020 04:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30

Arnab Goswami | अर्णव गोस्वामींना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

शहर : देश

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामींना  सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा देण्यात आला आहे.  अर्णव गोस्वामींसह इतर दोन जणांना जामीन देण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती  चंद्रचूड आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्याबेंचसमोर गोस्वामींच्या याचिकेवर सुनावणी झाली. अर्णव गोस्वामींसाठी ज्येष्ठ वकील हरीश साळवेंनी युक्तिवाद केला. हरीश साळवे यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्णव गोस्वामींविरुद्धची एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती.

हरीश साळवे यांनी अर्णव गोस्वामींना जामीन दिल्यास आभाळ कोसळेल का?, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात उपस्थित केला. हरीश साळवेंनी युक्तिवाद करताना “अन्वय नाईक यांनी त्यांच्या आईची हत्या करुन आत्महत्या केली, असा आरोप केला. हरीश साळवे यांनी अर्णव गोस्वामींविरुद्ध सूड भावनेने कारवाई होत असल्याचेही न्यायालयात सांगितले. महाराष्ट्राच्या विधानसभेत झालेल्या चर्चेचा आणि इतर प्रकरणांचा दाखला साळवेंनी दिला.

मुंबई उच्च न्यायालयाने अर्णव गोस्वामींचा अर्ज फेटाळला

दरम्यान, अर्णव यांच्यावतीने त्यांच्या वकिलाने एफआयआर रद्द करण्यासाठी आणि जामीन मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता. तीन दिवस त्यावर दोन्ही बाजूने युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर हायकोर्टाने हा अर्ज फेटाळून लावत अर्णव यांना जामीन देण्यास नकार दिला होता. हे एक्सट्रा ऑर्डिनरी प्रकरण नाही. त्यामुळे जामिनासाठी ज्या प्रचलित यंत्रणा आणि पद्धती आहे. त्यानुसारच अर्ज करून जामीन घेण्यात यावा, असे निर्देश कोर्टाने दिले होते.

अर्णव गोस्वामींच्या प्रकरणात जामीन दिल्यास ही प्रथा पडून जाईल आणि कोणीही उठसूठ उच्च न्यायालयात येऊन जामिनासाठी अर्ज करेल, असं मतही कोर्टाने व्यक्त केलं होतं. तसेच जामिनासाठी सत्र न्यायालयात जाण्याचे निर्देशही कोर्टाकडून देण्यात आले होते. दरम्यान, राज्य सरकारनेही सर्वोच्च न्यायालयात एक कॅव्हिट दाखल केलं असून आमचंही म्हणणं ऐकून घ्यावं अशी विनंती कोर्टाला केली आहे.

मागे

...तर उद्धव ठाकरेंना अटक करणार का; सर्वोच्च न्यायालयात हरीश साळवेंचा युक्तिवाद
...तर उद्धव ठाकरेंना अटक करणार का; सर्वोच्च न्यायालयात हरीश साळवेंचा युक्तिवाद

रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी (Arnab goswami ) यांच्या अंतरिम जामि....

अधिक वाचा

पुढे  

तब्बल 8 दिवसांनंतर अर्णव गोस्वामी यांची तळोजा जेलमधून सुटका
तब्बल 8 दिवसांनंतर अर्णव गोस्वामी यांची तळोजा जेलमधून सुटका

तब्बल 8 दिवसांनंतर अर्णव गोस्वामी यांची तळोजा जेलमधून सुटका करण्यात आली आ....

Read more