ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत अटक वॉरंट जाहिर...

By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 24, 2019 01:56 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत अटक वॉरंट जाहिर...

शहर : मुंबई

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात यवतमाळच्या पुसद न्यायालयानं वॉरंट जाहिर केलं आहे. मराठा क्रांती मोर्चासंदर्भात सामना दैनिकात प्रकाशित केलेल्या एका व्यंगचित्रा प्रकरणी हे वॉरंट बजावण्यात आलेत. व्‍यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई आणि प्रसिद्धक राजेंद्र भागवत यांच्‍याविरुद्धही वॉरंट जारी करण्यात आलंय. मराठा आरक्षणाच्या मागणी घेऊन झालेल्या आंदोलनादरम्यान शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून हे व्यंगचित्र प्रसिद्ध करण्यात आलं होतं. कोर्टासमोर हजर न झाल्यानं कोर्टानं उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरुद्ध वॉरंट बजावलंय. या व्यंगचित्रावरून दत्ता सूर्यवंशी या याचिकाकर्त्यांनी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. सुनावणीदरम्यान, उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत आणि इतर आरोपी कोर्टासमोर हजर झाले नाहीत. त्यामुळे कोर्टानं त्यांच्याविरुद्ध समन्सही धाडले. त्यानंतर आता न्यायालयानं आरोपींविरुद्ध १५ हजार रुपयांचं बेलेबल वॉरंट जारी केलंय. 

मागे

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी घड्याळ उलटा का घालतात; जाणून घ्या कारण
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी घड्याळ उलटा का घालतात; जाणून घ्या कारण

पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही मुलाखत राजकीय नव्हती. त्यामुळे त्यांनी व्यक्....

अधिक वाचा

पुढे  

अरुणाचल प्रदेशमध्ये 6.1 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के
अरुणाचल प्रदेशमध्ये 6.1 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के

अरुणाचल प्रदेशमध्ये मंगळवारी मध्यरात्री भूकंपाचे झटके जाणवले. मंगळवारी र....

Read more