ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पाकिस्तानची नौटंकी उघड; एअरस्ट्राइकमध्ये 170 दहशतवाद्यांचा खात्मा

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 09, 2019 12:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पाकिस्तानची नौटंकी उघड; एअरस्ट्राइकमध्ये 170 दहशतवाद्यांचा खात्मा

शहर : विदेश

इंडियन एअरफोर्सने  26 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकबाबत पाकिस्तनला तोंडावर पाडणारी धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारताने केलेल्या या एअर स्ट्राइकमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या 130 ते 170 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचा दावा इटलीच्या महिला पत्रकार फ्रान्सेस्का मॅरिनो यांनी इंडिया टिव्हीशी बोलताना केला आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून केली जात असलेली नौटंकी उघड झाली आहे. 26 फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये 130 ते 170 दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. सद्यघडीला येथील शिबिरांमध्ये जवळपास 45 जणांवर उपचार सुरू आहेत. तर उपचारादरम्यान 20 जणांचा मृत्यू झाला आहे. एअर स्ट्राइक करण्यात आलेला तो बालाकोटचा भाग अद्यापही सील करून ठेवण्यात आलेला आहे. हल्ल्यातील जखमींवर योग्य उपचार होत नाहीत असाही खुलासा यावेळी त्यांनी केला.
इंडिया टिव्हीशी बोलताना प्रान्सेस्का म्हणाल्या की, एअर स्ट्राइकनंतर बालाकोटमध्ये पाकिस्तानची सेना पोहोचली. जखमींना सैन्यांनी शिनकियारीमधील एका हरकत-उल-मुजाहिद्दीन शिबिरात दाखल केलं. त्यानंतर तेथे पाकिस्तानी सैन्याच्या डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. जे लोकांवर उपचार करण्यात आले आहेत, ते अद्यापही पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात आहेत. त्यांना अद्याप घरी सोडण्यात आलेलं नाही.

मागे

पुण्यामध्ये भीषण आग; पाच कामगारांचा मृत्यू 
पुण्यामध्ये भीषण आग; पाच कामगारांचा मृत्यू 

पुण्यातील देवाची ऊरळी येथील राजयोग साडी सेंटर या दुकानाला गुरुवारी पहाटे स....

अधिक वाचा

पुढे  

कोयनेचे पाणी राज्यासाठी राखीव ठेवा; आ. शूभंराज देसाईंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
कोयनेचे पाणी राज्यासाठी राखीव ठेवा; आ. शूभंराज देसाईंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कोयना नदीचे पाणी कर्नाटकाला न देता ते राज्यासाठी राखीव ठेवण्यात यावे, अशी म....

Read more