ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शेअर बाजार कोसळला; आशियाई बाजाराची पडझड सुरुच

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 16, 2020 11:45 AM 2019-02-12T14:15:30+5:30

शेअर बाजार कोसळला; आशियाई बाजाराची पडझड सुरुच

शहर : मुंबई

कोरोनाचा कहर आणि जगभरातील अर्थव्यवस्थेवर झालेल्या त्याच्या थेट परिणामांचे पडसाद भारतातही दिसू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱी शेअर बाजाराची पडझड सोमवारीही कायम राहिली.

सोमवारी शेअर बाजार मोठ्या फरकाने कोसळला. ज्यामध्ये सेन्सेक्स २००५ अंकांनी पडला, तर निफ्टी ६११ अंकांनी आपटला. आशियाई बाजारात एकंदरच पुन्हा एकदा पडझ़ड झाली. याव्यतिरिक्त हाँगकाँग, शाँघाय, टोकियोचे बाजारही सोमवारी गडगडले .

कोरोनाच्या परिणामामुळे शेअर बाजाराचा आलेख गुंतवणूकदारांच्या काळजाचा ठोका चुकवत आहे. दरम्यान, आज SBI कार्डचा आयपीओ बाजारात लिस्ट होणार आहे. शिवाय अमेरिकन रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात कपातही केली आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या या आर्थिक उलाढालींमध्ये कोणाला फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल.

मागे

'महा'राष्ट्रीय आपत्ती! शनिवारी दिवसभरात १२ रुग्णांची पडली भर, राज्यात सर्वाधिक ३१ रुग्ण
'महा'राष्ट्रीय आपत्ती! शनिवारी दिवसभरात १२ रुग्णांची पडली भर, राज्यात सर्वाधिक ३१ रुग्ण

राज्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा ३१ वर गेला आहे. पुणे १५, मुंबई ५, कामोठे पन....

अधिक वाचा

पुढे  

कोरोनाची अफवा पसरवणाऱ्या दोघांवर  गुन्हा दाखल
कोरोनाची अफवा पसरवणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

कोरोना व्हायरसची अफवा पसरवणाऱ्या दोघांवरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आष....

Read more