By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 16, 2019 01:34 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत वाजपेयींच्या स्मृतीस्थळांना वंदन केले तर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी ट्विटरवरून वाजपेयींना श्रद्धांजली वाहिली. केंद्रातील मोदी सरकारने 2014 मध्ये वाजपेयींना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने गौरवले होते. वाजपेयी हे भाजपाचे जेष्ठ आणि अजातशत्रू असे नेते होते. 1996 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान झाले. त्यावेळी 13 दिवसात त्यांचे सरकार कोसळले होते. 1998 मध्ये ते पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान झाले. त्यावेळी त्यांचे सरकार तेरा महिने चालले. 1999मध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेल्या वाजपेयीनी पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. 2004 पासून प्रकृती अस्वास्थामुळे राजकारणापासून दूर होते.देशाच्या विकासात अटल बिहारी वाजपेयी यांचा मोलाचा वाटा आहे. दोन जागांवर विजय मिळवणाऱ्या भाजपला मोठे यश मिळवून देण्याचं श्रेय त्यांनाच जाते. त्यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात रस्त्याच्या माध्यमातून देशाला जोडण्याचे काम केले. त्यांनी चेन्नई, कोलकत्ता, दिल्ली आणि मुंबईला जाण्यासाठी रस्ता प्रकल्प योजना लागू केली. तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी पंतप्रधान 'ग्रामीण रस्ते विकास योजना' लागू केली माजी पंतप्रधान राजीव गांधी हे भारतातील 'दूरसंचार क्रांतीचे जनक' मानले जातात. सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम वाजपेयी यांनी आपल्या कार्यकाळात केले. त्यांनी 6 ते 14 वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत करण्यात आला
6 ते 14 वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण काम त्यांच्याच कार्यकाळात सुरू करण्यात आला. 2000 ते 2001 या कालावधीत हे अभियान राबविण्यात आल. यानंतर मध्येच शिक्षण सोडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली होती. या योजनेचे चांगले परिणाम आजही पाहायला मिळतात. मे 1998 मध्ये भारताने पोखरणमध्ये अणूचाचणी घेतली होती. 1974 नंतर भारताने केलेली ही दुसरी अणूचाचणी होती. भारत हा देखील आण्विक शक्ती असलेला देश आहे. हे दाखवून देण्यासाठी ही चाचणी करण्यात आली होती. त्यांच्या निर्णयाचा अनेक स्तरातून विरोध झाला. मात्र या चाचणीनंतर भारत एक शक्तिशाली देश म्हणून जगाच्या समोर आला. वाजपेयी आपल्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात भारत-पाकिस्तान या देशांमधील संबंध सुधारण्यासाठी अनेक मोलाचे प्रयत्न केले. फेब्रुवारी 1999 मध्ये त्यांनी दिल्ली लाहोर ही बससेवा सुरू केली. पहिल्या बस मधून ते स्वतः लाहोरला गेले होते. त्यानंतर त्यांनी तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेतली होती. विशेष म्हणजे केंद्रात बहुमत नसताना त्यांनी हे देश हिताचे निर्णय घेतले
गेले काही दिवस मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी प्रयोग चालू असल्याचे ....
अधिक वाचा