ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

एटीएम कार्डच्या वापरावर निर्बंध येण्याची शक्यता

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 27, 2019 07:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30

एटीएम कार्डच्या वापरावर निर्बंध येण्याची शक्यता

शहर : delhi

बँकेतून पैसे काढण्यासाही सर्रास आता एटीएम कार्डचा वापर केला जात आहे. अशाप्रकारे सतत एटीएम कार्डचा वापर होत असल्याने फसवणुकीच्या घटनाही वाढल्या आहेत. त्यामुळे एटीएम कार्ड वापरण्याच्या काही महत्वाच्या नियमांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. कारण एटीएम मधून पैसे काढण्यावर निर्बंध आणण्याचा बँकांचा विचार आहे.

फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी दिल्ली स्टेट लेवल बॅंकर्स कामितीने (एसेलबीसी) बँकांना काही सूचना केल्या आहे. या सूचनाना मंजूरी मिळाल्यास त्याचा परिणाम थेट ग्राहकांवर होणार आहे. या सुचंनानुसार दोन एटीएम व्यवहारामध्ये 6 ते 12 तासांचे अंतर असणे आवश्यक आहे. याचाच अर्थ  जर एटीएम मधून एकदा पैसे काढले आणि पुन्हा पैसे काढायचे असतील तर त्यासाठी 6 ते 12 तास थांबावे लागणार आहे. 6 ते 12 तासानंतर दुसर्‍यांदा पैसे काढता येतील. या सूचनेवर 18 बँकाच्या प्रतिनिधींच्या बैठकीतच चर्चाही झाली होती. या व्यतिरिक्त बँकांना इतर पर्याय देण्यात आले आहेत. त्यामध्ये अनधिकृतरित्या पैसे काढण्याचा प्रयत्न झाल्यास खातेधारकाला इशारा देण्यासाठी त्याच्या मोबाइल क्रमाकावर ओटीपी पाठविणे, तसेच एटीएमच्या सेंट्रलाइज मोनिटरिंग सिस्टमचाही पर्याय सुचविण्यात आला आहे. अशा प्रकारची सिस्टम सध्या ओबीसी बँक, स्टेट बँक, पीएनबी, आयडीबीआय बँकेत लागू आहे.

मागे

मेट्रोने फुकट्यांकडून 53 लाख रुपये दंड वसूल केला
मेट्रोने फुकट्यांकडून 53 लाख रुपये दंड वसूल केला

मेट्रोमधून विनाटिकीट पवास करणे कठीण असल्याचा अनेकांचा समाज आहे. परंतु मेट्....

अधिक वाचा

पुढे  

'भुक फाऊंडेशन'च्यावतीने  पुरग्रस्तासाठीचे  आरोग्य शिबीर संपन्न
'भुक फाऊंडेशन'च्यावतीने  पुरग्रस्तासाठीचे  आरोग्य शिबीर संपन्न

कोल्हापुरात महापुरामुळे गावे उध्वस्त झाली. 15 दिवसांनंतर पुराचे पाणी ओसरल्....

Read more