ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राफेल प्रोजेक्टच्या भारतीय व्यवस्थापन कार्यालयात घुसखोरीचा प्रयत्न,पोलिसांकडून अधिक तपास सुरू

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 22, 2019 05:59 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राफेल प्रोजेक्टच्या भारतीय व्यवस्थापन कार्यालयात घुसखोरीचा प्रयत्न,पोलिसांकडून अधिक तपास सुरू

शहर : देश

राफेल डीलचा आढावा घेण्यासाठी फ्रान्सला गेलेल्या भारतीय हवाई दलाच्या राफेल प्रकल्पाच्या व्यवस्थापन पथकाच्या कार्यालयात घुसखोरीचा प्रयत्न झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्रान्सची राजधानी पॅरिसबाहेर रविवारी रात्री ही घटना घडली. या घटनेची माहिती हवाई दलाकडून संरक्षण मंत्रालयाला देण्यात आली. रविवारी रात्री भारतीय हवाई दलाच्याराफेल डीलबद्दलच्या आढावा पथकाच्या कार्यालयात काही अज्ञात व्यक्तींनी घुसखोरीचा प्रयत्न केला. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा योजनेबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती चोरण्याच्या उद्देशानं हा प्रयत्न करण्यात आला. 'राफेल प्रकल्पाच्या व्यवस्थापन पथकाचं कार्यालय पॅरिसबाहेरील उपनगरात आहे. त्या ठिकाणी घुसखोरीचा प्रयत्न झाला. यावेळी कोणतीही कागदपत्रं किंवा हार्ड डिस्क चोरीला गेली नाही. याबद्दलची अधिक माहिती अद्याप मिळालेली नाही,' असं हवाई दलातील सूत्रांनी सांगितलं.राफेल प्रकल्पाचं पथकाचं नेतृत्त्व ग्रुप कॅप्टन रँकच्या अधिकाऱ्याकडून केलं जातं. 36 राफेल विमानांच्या निर्मितीपासून वैमानिक आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणापर्यंतची जबाबदारी या अधिकाऱ्याकडे आहे. वैमानिकांना उड्डाणाचं आणि ग्राऊंड स्टाफला देखभालीच्या कामाचं प्रशिक्षणाचा यामध्ये समावेश आहे. भारतीय हवाई दलाच्या या पथकाचं कार्यालय पॅरिसमधील सेंट क्लाऊड सबर्बमध्ये आहे. या कार्यालयात फारशी रोख रक्कम नसते. त्यामुळे गोपनीय माहिती चोरण्यासाठी घुसखोरीचा प्रयत्न झाला असावा, अशी माहिती सूत्रांनी दिली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

 

 

मागे

पाकिस्तानची आर्थव्यवस्था डबघाईला,पाकिस्तानवर आर्थिक संकट
पाकिस्तानची आर्थव्यवस्था डबघाईला,पाकिस्तानवर आर्थिक संकट

पाकिस्तानची आर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. त्यामुळे पाकिस्तानपुढे मोठे आर....

अधिक वाचा

पुढे  

Election results 2019 : 'सीमोल्लंघन झालेलं आहे'; विखे-पाटील यांचे भाजप प्रवेशाचे संकेत
Election results 2019 : 'सीमोल्लंघन झालेलं आहे'; विखे-पाटील यांचे भाजप प्रवेशाचे संकेत

लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप प्रणित एनडीएने जोरदार मुसंडी मारली आहे. राज्यभर....

Read more