ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पुण्यात खासगी रुग्णालयांच्या बिलांचे ऑडिट, पाच दिवसात 29 लाखांची अतिरिक्त बिले कमी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 21, 2020 11:24 AM 2019-02-12T14:15:30+5:30

पुण्यात खासगी रुग्णालयांच्या बिलांचे ऑडिट, पाच दिवसात 29 लाखांची अतिरिक्त बिले कमी

शहर : पुणे

कोरोना काळात काही खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात बिले आकारले आहेत. त्यामुळे आतापर्यंत अनेक रुग्णांचा रुग्णालय प्रशासनासोबत वाद झाल्याचे समोर आले आहे. पुण्यात गेल्या पाच दिवसांमधील खासगी रुग्णालयांच्या बिलांची तपासणी महापालिकेच्या लेखा परीक्षकांनी केली आणि तब्बल 29 लाखांची अतिरिक्त बिले कमी करण्यात आली. त्यामुळे कोरोना रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

महापालिकेने नियुक्त केलेल्या लेखापालांनी 14 ते 18 ऑगस्ट या कालावधीत खासगी रुग्णालयांकडून आलेल्या 1 कोटी 18 लाख 43 हजार 997 रुपयांच्या बिलांची तपासणी केली. यामध्ये 36 बिलांमध्ये तब्बल 29 लाख 24 हजार 203 रुपयांची अतिरिक्त रक्कम लावली गेली असल्याचे आढळून आले. त्यामुळे लेखा परीक्षकांनी ही रक्कम संबंधित बिलांमधून वगळून 89 लाख 19 हजार 764 रुपयांचीच बिले मंजुर केली, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.

कोरोना काळात राज्यातील अनेक खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट सुरु असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्य सरकारने याकडे लक्ष घालत अतिरिक्त बिल आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई केली जाईल, अशा सूचना सरकारने दिल्या होत्या. नुकतेच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही अतिरिक्त बिल आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई केली जाईल, असं सांगितले होते.

मागे

केंद्र सरकार 'या' ४ बँकांचे खासगीकरण करण्याच्या तयारीत
केंद्र सरकार 'या' ४ बँकांचे खासगीकरण करण्याच्या तयारीत

मोदी सरकारकडून लवकरच देशातील चार प्रमुख सरकारी बँकांचे खासगीकरण केले जाण्....

अधिक वाचा

पुढे  

केंद्र सरकारने वाहतुकीवरील निर्बंध कमी केले आहेत. मात्र, प्रत्येक राज्यात त्या त्या ठिकाणी असलेल्या
केंद्र सरकारने वाहतुकीवरील निर्बंध कमी केले आहेत. मात्र, प्रत्येक राज्यात त्या त्या ठिकाणी असलेल्या

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये टप्प्याटप्प....

Read more