By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 16, 2019 07:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
ऑगस्ट 2019 मध्ये सर्व वस्तूंसाठीचा घाऊक किंमत निर्देशांक 0.2 टक्के वाढून तो 121.4 (तात्पुरती आकडेवारी) झाला. या आधीच्या महिन्यात तो 121.2 होता.
चलनफुगवटा
घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याच्या दरात जुलै 2019 च्या तुलनेत ऑगस्ट 2019 मध्ये कोणताही बदल न होता तो 1.08 टक्के कायम राहिला. गेल्या वर्षी याच कालावधीत तो 4.62 होता.
प्राथमिक वस्तू
या गटाच्या निर्देशांकात 1.3 टक्के वाढ होऊन तो 143.9 (तात्पुरती आकडेवारी) झाला. या आधीच्या महिन्यात तो 142.1 होता.
अन्नधान्य गटाच्या निर्देशांकात 1.4 टक्के वाढ होऊन तो 155.9 झाला. अखाद्य वस्तू गटाच्या निर्देशांकात 0.9 टक्के वाढ झाली. कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस गटाच्या निर्देशांकात 1.4 टक्के वाढ झाली.
इंधन आणि वीज
या गटाच्या निर्देशांकात 0.1 टक्के वाढ झाली.
निर्मित उत्पादने
या गटाच्या निर्देशांकात 0.3 टक्के घट झाली.
अन्नधान्यावर आधारित चलनफुगटवट्याचा दर
अन्नधान्यावर आधारित चलनफुगवट्याच्या दरात वाढ झाली. जुलै 2019 मध्ये तो 4.54 टक्के होता. ऑगस्ट 2019 मध्ये तो 5.75 टक्के वर पाहोचला.
इमारतींच्या पुनर्बांधणीनंतर मुळ सदनिकाधारकांना मोफत घर बांधून देतांना त्....
अधिक वाचा