By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 10, 2019 02:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : औरंगाबाद
औरंगाबादमधील बाळासाहेबांच्या स्मारकासाठी एकही ठेवेदार पुढे येईना अशी अवस्था झाली आहे. औरंगाबाद महापालिकेने बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 48 कोटींची निविदा काढली आहे. परंतु, ही निविदा आतापर्यंत एकाही ठेकेदाराने भरली नाही. औरंगाबाद महापालिकेवर सध्या शिवसेनेची सत्ता आहे आणि महापालिकेचेन ही निविदा काढली आहे. परंतु, ही निविदा भरण्यासाठी एकही ठेकेदार पुढे आलेला नाही. त्यामुळे महापालिकेने या निविदेसाठी मुदत वाढविली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर औरंगाबाद महापालिकेने 17 एकर जागेत 93 फूट उंचीचा बाळासाहेबांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला त्यावेळी शिवसेनेचे त्र्यंबक तुपे महापौर होते.
महापालिकेच्या जागेवर एमजीएम परिसरात बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने स्मृतीवन आणि स्मारक उभारण्याचे ठरवण्यात आले होते. त्यावेळी तत्कालिन पालकमंत्री रामदास कदम यांनी या स्मारकासाठी सरकारकडून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन दिला होता.
दादरसारख्या गजबजलेल्या व मोक्याच्या ठिकाणी असलेल्या ‘शारदा’ या थिएटरच....
अधिक वाचा