By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 08, 2020 01:49 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
मेलबर्न - ऑस्ट्रेलियाच्या जंगलात लागलेली भीषण आग अजूनही उग्र रूप धारण करीत आहे. जास्त पाणी पितात म्हणून ऑस्ट्रेलियात १० हजार उंटांची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ऑस्ट्रेलियातील या भीषण आगीत आतापर्यन्त ८० कोटींपेक्षा अधिक वन्य जीवांचा बळी गेला आहे.
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हे उंट मानवी वस्तीत येऊन पाण्याचा साठा संपवत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली होती. यामुळे लोकांना उंटांचा मोठा त्रास होऊ लागला होता. याची दखल घेत तेथील प्रशासनाने व्यावसायिक शुटर्सना या उंटांना गोळ्या घालून ठार करण्याचे आदेश दिले. या व्यावसायिक शूटर्सनी हेलिकॉप्टर्समधून उंटाना गोळ्या घालून ठार केले.
तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियात प्राण्यांना वाचवण्याची मोहीम गेल्या काही दिवसांपासून सुरू करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या या भीषण आगीत सापडलेल्या तब्बल ९० हजार प्राण्यांना प्राणीप्रेमी आयर्वीन कुटुंबाने वाचवले आहे. या कुटुंबाने या प्राण्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. आयर्वीन कुटुंबीयांप्रमाणे इतरही अनेक नागरिकांनी प्राण्यांचे जीव वाचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. परंतु उंटांना मारण्याचे वृत्त पसरताच प्राणी प्रेमींमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.
मुंबई – दिवसेंदिवस मुंबईच्या लोकलमध्ये प्रवाशांची वाढणारी गर....
अधिक वाचा