By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 22, 2020 11:25 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबईत ऑटो आणि टॅक्सी संघटनेनं (Auto Taxi Union)किमान मीटर भाड्यात वाढ करण्याची मागणी केलीय. जर संघटनेच्या या मागणीला मान्यता मिळाल्यास मुंबईकरांचं बजेट कोलमडू शकतं. संघटनेकडून रिक्षासाठी कमीत कमी 2 रुपये आणि टॅक्सीसाठी 3 रुपये भाडेवाढीचा प्रस्ताव आहे. गेल्या पाच वर्षांपासून रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात कोणतीही वाढ झालेली नाही. त्यातच कोरोनाच्या संकटामुळे ऑटो आणि टॅक्सी चालकांना उदरनिर्वाहाचा प्रश्न भेडसावतोय. मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत ऑटो आणि टॅक्सी संघटनांच्या मागण्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीसाठी खटुआ समितीची शिफारस लागू करण्यात आलीय. सरकारनं या समितीच्या शिफारशी स्वीकारलेल्या आहेत. त्यामुळे आयोजित केलेल्या बैठकीत भाडेवाढीसंदर्भातही चर्चा होण्याची शक्यता आहे. या शिफारशीनुसार टॅक्सीचा 8 टप्प्यांत आणि रिक्षाचा 4 टप्प्यांत भाडेवाढीचा प्रस्ताव असून, त्यात रिक्षा आणि टॅक्सी संघटनांच्या अनेक मागण्यांचा समावेश आहे.
रिक्षाचं भाडं किमान दोन रुपयांनी आणि टॅक्सीचं भाडं किमान 3 रुपयांनी वाढवा
परिवहन आयुक्त अविनाश धाकने म्हणाले, 22 डिसेंबरला परिवहन प्राधिकरणाच्या एका बैठकीत रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीच्या मुद्द्यावर चर्चा केली जाणार आहे. तसेच यासंदर्भात समिती अंतिम निर्णय घेणार आहे. सरकारनं नियुक्त केलेल्या हकीम समितीच्या सूत्रांनुसार दरवर्षी जूनमध्ये रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ केली जाते.
सद्यस्थितीत काळ्या-पिवळ्या रिक्षाचं किमान भाडं 18 रुपये आहे. तर टॅक्सीचं किमान भाडे 22 रुपये आहे. रिक्षाचं भाडं किमान दोन रुपयांनी आणि टॅक्सीचं भाडं किमान 3 रुपयांनी वाढवण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे रिक्षाचं भाडं 20 रुपयांवरून वाढून 22 रुपये आणि टॅक्सीचं भाडं 22 रुपयांवरून वाढून 25 रुपये झालंय. या संबंधीचा अंतिम निर्णय प्राधिकरणाच्या बैठकीत घेतला जाणार आहे.
टॅक्सीचे दर 22 रुपयांवरून 25 रुपये होण्याची शक्यता
गेल्या तीन वर्षांपासून रिक्षा आणि टॅक्सी युनियनकडून वारंवार होणाऱ्या भाडेवाढी संदर्भात बैठका झाल्या. परंतु भाडेवाढ काही केल्या होईना. अखेर येत्या नवीन वर्षात म्हणजेच 2020 मध्ये रिक्षा आणि टॅक्सीचे भाडेवाढ होणार आहे. सध्या रिक्षाचे दर 18 रुपये मीटर असून ते आता 20 रुपये होणार आहे. तर दुसरीकडे टॅक्सीचे दर 22 रुपयावरून 25 रुपये होणार आहे. म्हणजेच रिक्षाच्या दरात 2 रुपयांनी तर टॅक्सीच्या दरात 3 रुपयांनी दर वाढ होणार आहे. एकीकडे महागाई आणि दुसरीकडे ही भाडेवाढ जर झाली तर सर्वसामान्यांना परवडणार नसल्याचे सर्वसाधारण नागरिक सांगत आहे. तर दुसरीकडे रेल्वेची देखील भाडेवाढ झाल्यामुळे सर्वसामान्य जनता नाराज आहे.
यूकेमधील कोरोना विषाणूच्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महाप....
अधिक वाचा